
महाराजांच्या पादुका
गुरूर्ब्रह्मा, गुरूर्विष्णू, गुरूर्देवो महेश्वरः ।
गुरूः साक्षात् परब्रह्म ।
तस्मै श्रीगुरूवे नमः ।।
-------------------------------------------

॥ जानकीजीवनस्मरण जय जय राम।॥
॥पार्वतीपते हरहर महादेव॥
॥पुंडलिकवरदे हरि विठ्ठल॥
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज की जय ।
आत्मनिवेदन हेच साधन (३० ते ३४)
------------------------------
मीपणा संपूर्ण गेला की संगातीत अवस्था प्राप्त होते. मी गेला की लक्ष्य जाते
लक्ष्य गेले की अलक्ष्य पण नाहीसारखे होते
शुध्द आत्मस्वरूप तेवढे शिल्लक राहते.
-------------------
जे दिसते त्यास आत्मा म्हणून कवटाळले तर मोक्ष हातून सुटतो म्हणून आत्मनिवेदन करावे. आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण. हाच राजमार्ग आहे.
----------
जेथे मी व तू उरत नाही त्यास आत्मनिवेदन म्हणतात.
या केवल स्वरूपास विज्ञान म्हणतात.
ज्याला ही आत्मनिवेदनाची स्थिती लाभते त्याला पुन्हा जन्मास येणे नसते.
कसं सांगू?
- सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "महाराज" सोडून मला दुसरा ध्यासच नसतो.
- प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची सवय लागलीय
- काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटतं. माझ्यातलं दोषदर्शन होतं - मीपणा, लौकिकाची सूक्ष्म आस लक्षात येते.