महाराजांचे सद्‌गुरु श्रीतुकामाई

श्रीतुकामाई
-----------------
महाराजांचं चरित्र वाचून आपल्या सद्‌गुरुंविषयी खोलवर जाणून घ्यावं असं अनुग्रहानंतर मला वाटलं.
त्याच दिवशी मी गोंदवल्याला चरित्र घेतलं. घरी जाऊन ते कधी एकदा वाचते असं मला झालं होतं.
अर्थातच, त्यांचे सद्‌गुरु कोण होते? ते कसे होते?

श्रीतुकामाईंची पार्श्वभूमी
-------------------------
मूळ गाव -
मराठवाड्यात
नांदेडपासून जवळ
यवतमाळ जिल्हा
उमरखेडपासून जवळ
येहळेगाव
येथे त्यावेळी निजामशाही (मोंगलाई) होती.

श्रीतुकामाईंचे बालपण
------------------------
श्रीतुकामाई कसे होते?
- त्यांचे डोळे खूप तेजस्वी होते
- ते आजानुबाहू (गुडघ्यापर्यंत हातची बोटे पोचणे - अवतारी पुरुषाचे लक्षण)) होते.

श्रीतुकामाईंची कुमारावस्था
----------------------------
- श्रीतुकामाई १२-१३ वर्षांचे असताना एकदा त्यांनी वडिलांना विचारले की," तुम्ही रोज डोळे झाकून बसता तेव्हा काय करता?"
तेव्हा वडिल म्हणाले की," मी माझ्या गुरुचे ध्यान करतो".
त्यावर श्रीतुकामाई उद‌गारले की,"गुरुचे ध्यान करायला डोळे झाकायलाच हवेत का?"

श्रीचिन्मयानंदांनी केलेला अनुग्रह
----------------------------------
येहळेगावाहून थोड्याच अंतरावर उमरखेड म्हणून एक गाव आहे.
तेथे श्रीचिन्मयानंद नावाचे एक फार मोठे थोर सत्पुरुष राहात असत.
एकदा पंढरपूरची यात्रा संपवून ते परत आपल्या गावी जात होते.
वाटेमध्ये ते येहळेगावी उतरले.
पहाटे उठून ते स्नानासाठी नदीवर गेले. तेव्हा अंधुकसा प्रकाश होता.

श्रीतुकामाईंची गुरुपरंपरा
-------------------------

आदिनाथ
मच्छिंद्रनाथ
गोरखनाथ
मुक्ता वटेश्वर
चक्रपाणि

श्रीतुकामाईंची बाह्य स्थिती
----------------------------
श्रीतुकामाईंचे बाह्य रूप
- पिवळसर गोरा वर्ण
- आजानुबाहु
- भरलेले शरीर
- प्रसन्न व शांत मुद्रा

श्रीतुकामाईंचे अंतरंग
----------------------
- हे योगीराज अति थोर महात्मा होते
- नाथपरंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या श्रीतुकामाईंजवळ होती.

श्रीतुकामाईंनी कल्याण केलेले जीव
------------------------------------
श्रीतुकामाई सर्वसामान्य प्रापंचिकांबद्दल म्हणत की
- जो येतो तो आपल्या प्रपंचासाठी
- मला बरं नाही
- माझ्या बायकोला बरं नाही
- मला मूलबाळ नाही

श्रीतुकामाईंचे अंतरंगातील शिष्य
----------------------------------
खर्‍या जिज्ञासूशी ते फारच प्रेमळपणे वागत असत.
त्यांचे बोलणे गूढ असे, पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर समजे.
ज्याचा त्याचा अधिकार पाहून तुकामाई योग/भक्ति/दानधर्म/तीर्थयात्रा करायला सांगत.

तुकामाईंचं अवलियेपण
------------------------
१) सूर्यग्रहणाच्या पर्वकालात एका बंद खोलीतून श्रीतुकामाई दोन जणांना बरोबर घेऊन नाहीसं झाले व गोदावरीत स्नान करून ओळखीच्या लोकांना भेटून परत त्याच खोलीत परत आले.

श्रीतुकामाईचे महानिर्वाण
-------------------------
सन १८८७ जून महिन्यात रात्री, ज्येष्ठ महिन्यात शुध्द अष्टमीस शुक्रवारी येहळेगाव येथे श्रीतुकामाईंनी देह ठेवला. त्यावेळी ते ७४ वर्षांचे होते.

जवळजवळ ६ वर्षांनी म्हणजे २७ ऑक्टोबर २०१० मध्ये काही सज्जनांबरोबर अचानक संतांच्या स्थानांची भेट घेण्याच्या उद्देशाने विशेषतः महाराजांच्या गुरुपरंपरेतील गुरुस्स्थानांचे दर्शन घ्यावे व त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे मनात योजून येहळेगावला जाणं झालं.

निर्वाणानंतरची व्यवस्था

मी काही पुस्तकांच्या आधारे श्रीतुकामाईंनंतर आत्तापर्यंत कोणी कोणी या सर्व ऐहिक पारमार्थिक मालमत्तेची व्यवस्था पाहिली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.