महाराज आणि लहान मुले
----------------
- महाराज लहान असताना सुध्दा आपल्यापेक्षा लहान मुलांना ते रामनाम घ्यायला सांगत.
- विशीच्या आत असताना, आत्मसाक्षात्कार झाल्यावर तीर्थाटन करीत असताना, जिथे ते मुक्काम करीत असत तिथे ते, तेथील लहाल मुलांना व मुलीना योगाभ्यास शिकवीत,
महाराजांकडचे अन्नदान
---------------------
१८४५
महाराजांचे नामकरण - त्यांच्या आजोबांनी खूप अन्नदान केले.
१८५०
आजोबांनी नातवाची परीक्षा घेण्यासाठी विचारले - "तुला राजा केले तर तू काय करशील?"
महाराज आणि गाई
-------------------
१) तान्हेपणी महाराज रांगत गाईंकडे जात.
२) शाळा बंद झाल्यावर ते गाई चरायला नेऊ लागले.
३) नैमिषारण्यात बर्फावर रानगाईचे दूध सांडून त्याच्या वड्या तयार होत असत त्या महाराज खात असत.
सर्वाभूती रामराया दिसणं
----------------
- सर्वच ठिकाणी रामराया कसा भरुन राहिला आहे असे महाराज म्हणत असत
- प्रत्येक जड-चेतन वस्तूकडे बघताना त्यांना त्यात परमात्मा दिसत असे.
- शरण आलेल्या व अनुग्रहासाठी आलेल्या, शिष्यत्व घेणार्यामध्ये सुध्दा ते रामालाच पहात असत.
- सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "महाराज" सोडून मला दुसरा ध्यासच नसतो.
- प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची सवय लागलीय
- काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटतं. माझ्यातलं दोषदर्शन होतं - मीपणा, लौकिकाची सूक्ष्म आस लक्षात येते.