श्रीमहाराज चरित्र सार -
----------------
संदर्भ -
१) श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय
लेखक - श्री. के.वि.बेलसरे
२) श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन
संकलन - श्री. गो.सी. गोखले
नमस्कारत्रयोदशी
(संदर्भ - संपूर्ण श्रीसद्गुरुलीलामृत - श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचे ओवीबध्द चरित्र. लेखक - कै. श्री. गोपाळ विष्णू फडके)
-----------
महारुद्र जे मारूति रामदास ।
कलीमाजिं जे जाहले रामदास ।|
जनां उध्दराया पुन्हा प्राप्त होती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १॥
महाराजांच्या जन्माचे वैशिष्ठ्य -
महाराजांचे वडील गंभीर आणि नियमी होते. बाहेरून दिसायला साधे पण अंतर्यामी अती विरक्त, नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसत.
- आईच्या सांगण्यावरून ते रानात गाई चरायला नेऊ लागले.
- बरोबर मुलं असायची. त्यांना घेऊन चार दगड मांडून ते रामाचे भजन करीत.
- त्यांना भक्तांच्या गोड कथा सांगत.
महाराजांचा गुरूशोध
(१८५७-५८-५९)
महाराजांच्या घराजवळ गांवचे मारूतिमंदिर आहे, तेथे वस्तीला येणार्या बैरागी-गोसावी-वारकरी-यात्रेकरू यांना महाराज भगवंताविषयी प्रश्न विचारीत. एका वृध्द रामदासीने जेव्हा त्यांना सांगितले की सद्गुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही,
महाराजांची अनन्य गुरूभक्ती
-----------------
सद्गुरुसाठी वय १२ ते १४ या कुमारवयात महाराज भारतभर शोध घेतघेत हैदराबादकडे आले असता, श्रीसमर्थ परंपरेतील श्रीरामकृष्णांनी त्यांना येहळेगावला जाय़ला सांगितले. महाराज आधी नांदेडला गेले. तिथे त्यांनी गोदावरीत स्नान केले आणि ते येहळेगावच्या दिशेने जायला निघाले.
येहेळेगाव सोडल्यावर श्रीतुकामाईंबरोबर उमरखेड ते आले. तेथे श्रीचिन्मयानंदस्वामींचे दर्शन व आशीर्वाद त्यांनी ग्रहण केले.
श्रीतुकामाईंच्या सूचनेनुसार महाराजांचा एकांतवास सुरु झाला.