Blogs

या साईटमध्ये बदल केल्यापासून मुखपृष्ठावर असलेले महाराजांचे दर्शन मला व त्यांच्या असंख्य वाचकांना होत नव्हते. त्यामुळे मोठी चुटपुट लागली होती. काय करावे म्हणजे या grid format मध्ये ते बसविता येईल याचा विचार चालू होता. आज ते काम हाती घेतले. आपल्या एक नियमित वाचकाने मला सुचविले आणि ती महाराजांची इच्छा म्हणून सगळी कामे बाजूला ठेवून ते grid पूर्ण केले. हे grid उघडल्यानंतर पूर्वीसारखे मोठे फोटो लगेच दिसणार नाहीत. बरेच स्लाईडशो लिंकमध्ये embed केले आहेत. लिंक उघडली की ते दिसतील. त्यासाठी सुध्दा काही सेकंद थांबावे लागेल. नेटच्या स्पीडवरही ते अवलंबून असेल.

॥श्रीराम समर्थ॥

लेखन (टायपिंग) मदतीसाठी आवाहन

१६-१०-२०११

या वेबसाईटच्या वाचकांना माझा सप्रेम नमस्कार,

या वेबसाईटमध्ये अजून पुष्कळ लिहिणे बाकी आहे.
या कामाला जितका हातभार लागेल तितके हे काम पुढे जाईल.
अधिकाधिक वाचकांपर्यंत हे लेखन जावे ही महाराजांची इच्छा दिसते.
कोणतीही जाहिरात न करता दरमहा >४४५० वाचक या साईटला भेट देतात. त्याचे नियमित वाचक होतात. श्रीमहाराज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या अंतरंगात बदल घडवून आणतात.
त्यामुळे ही वेबसाईट हे महाराजांचे कार्य आहे.
हे काम होणे ही महाराजांची इच्छा आहे व आदेश आहे, असे मी मानते.

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर आपल्या गुरुबंधू व गुरुभगिनींना एकत्र आणणार्‍या या वेबसाईटचे नवे रुप खुले होत आहे.

पाचाइवजी एकच गुगल कॅलेंडरही ठेवले आहे.

www.anandachedohi.com येथील महाराजांवरची इ-बुक्स या वेबसाईटवर घेत आहोत.

आपले सहकार्य असू द्यावे.

नवीन रुप कसे वाटले ते जरुर कळवावे.

दसर्‍याच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

७ जुलै ते ६ ऑगस्ट या महिनाभराच्या काळात ४२३६ वाचकांनी आपल्या साईटला भेट दिली.

त्यातील >७०% वाचक नवे होते.
३०% वाचक नेहेमी भेट देणारे होते.

दरमहा सभासद होणार्‍यांची संख्या वाढती आहे.

सगळ्यात जास्त वाचक मुंबई व त्याखालोखाल पुण्याचे आहेत.

उरलेले ८/१० हे नवी दिल्ली, महापे, औरंगाबाद,कोल्हापूर, वालसाड, नागपूर,बंगलोर, सोलापूर येथून वाचणारे आहेत..

बेळगाव, नांदेड, अहमदाबाद, हैदराबाद, कलकत्ता येथूनही वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.

भारताबाहेरील वाचकांपैकी सगळ्यात जास्त वाचक अमेरिकेत रहाणारे आहेत.

या साईटच्या माध्यमातून महाराज कितीजणांपर्यंत पोचले आहेत हे यावरुन कळून येतं.

मी नुकताच google analytic चा रिपोर्ट पाहिला.

१० मे ते १० जून २०११ या महिन्याच्या कालावधीत एकूण २८५० वाचक आपल्या वेबसाईटला भेट देऊन गेले असे मला दिसले.

कोणतीही जाहिरात न केल्याने आणि कोणतेही कमर्शियल हेतू ठेवून कृती न केल्याने महाराजांनी त्यांच्या वेबसाईटकडे वाचक वळवले व त्यांच्याशी संवाद साधला असे दिसते.

वाचक इमेलच्या माध्यमातून संपर्क साधत आहेतच.

वेबसाईटवरही त्यांनी मोकळेपणाने लेखन केले तर अजून साईट रसरशीत होईल.

॥श्रीराम समर्थ॥

आपले एक वाचक या वेबसाईटचे सभासद होऊ इच्छित होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना होता येत नव्हते. ते त्यांनी मला इ-मेलवर कळवले.

मी माझ्या तांत्रिक सल्लागारांशी लगेच संपर्क साधला व स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये बसून तो अडसर दूर केला. सभासद होता येतय की नाही हे त्यांनी स्वतः चेक केलं.

ज्या वाचकांची गेल्या काही आठवड्यांत गैरसोय झाली त्यांची माफी या ब्लॉगद्वारा मागते.

आता निःशंकपणे सभासद आपल्याला होता येईल.

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद !

॥श्रीराम समर्थ॥

ही साईट खूप हेवी आहे.
यात प्रचंड पाने आहेत.
बरीच कॅलेंडर्स आहेत.
खूप फोटो आहेत.
खूप स्लाईड शोज आहेत.
त्यामुळे ती उघडायला तुम्हाला कदाचित वेळ लागत असेल.
खूप स्पीड व unlimited download/upload असलेले USB (photon +/3G) यांची गरज तुम्हाला भासू लागेल.

॥श्रीराम समर्थ॥

विविध माध्यमे - कॅलेंडर, पुस्तके, फोटो इ मध्ये दिसलेले महाराजांचे फोटो मला नेहमी उल्हसित करीत असतात. प्रत्येक फोटोत ते इतके वेगळे दिसतात की हेच ते महाराज हे सांगून खरे वाटत नाही.
मागच्या वर्षी एकदा वेळ काढून ते स्कॅन करुन ठेवले होते.
गेल्या दोन दिवसात, "गुगल पिकासात" दाखल केलेल्या माझ्या अल्बममधील महाराजांचे फोटो, "पिकनिक" हे नवीन माध्यम वापरुन एडीट केले व ते अजूनच छान दिसले.
त्याच्या slide show ची लिंक दिली.
"महाराजांचे फोटो" असा एक नवा ब्लॉक उजवीकडे तयार केला व त्यात स्लाईड शोच्या लिंक्स दिल्या.

महाराजभक्तांना सप्रेम दंडवत/नमस्कार.

आपल्या साईट मध्ये सध्या रोजच नवनवीन सभासदांची भर पडते आहे आणि आधीचे बरेच सभासद साईटवरील मजकूर वाचताना दिसत आहेत. पाहून बरे वाटते आहे.
महाराजांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने त्यांच्या इच्छेनुसार साईटचे काम चालू असताना सभासद त्यांच्या साईटकडे आकर्षित झाले नाही तरच नवल! सध्याच्या युगात महाराजांसारख्या संतांचे सूक्ष्म रुपाने कार्य चालू आहे याचेच हे द्योतक आहे यात शंकाच नाही.
या निमित्ताने "अनुसंधान" वर भक्तमंडळींचा एक मेळा जमवावा व एकमेकांना भेटवावे असे मला वाटले. इच्छा "त्यां"ची, सेवा माझी.

श्रीअध्यात्मरामायणावरचे लेखन upload करून २ वर्षे होऊन गेली होती.
आज एकदम सुरसुरी आली की एकदा पुन्हा ते लेख वाचावेत.
मग वाचतावाचता बदल सुचत गेले.
गुगल सर्च करुन चित्रे घेतली, ती घालणे चालू केले.
शिवाय "मला हे सर्व वाचून काय वाटले? तेही लिहायला सुरुवात केली.
कसे वाटते बघा!
http://www.anusandhan.org/node/103

॥श्रीराम समर्थ॥

Syndicate content