तुमच्याशी संवाद साधण्यातील पुढचा टप्पा

महाराजभक्तांना सप्रेम दंडवत/नमस्कार.

आपल्या साईट मध्ये सध्या रोजच नवनवीन सभासदांची भर पडते आहे आणि आधीचे बरेच सभासद साईटवरील मजकूर वाचताना दिसत आहेत. पाहून बरे वाटते आहे.
महाराजांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने त्यांच्या इच्छेनुसार साईटचे काम चालू असताना सभासद त्यांच्या साईटकडे आकर्षित झाले नाही तरच नवल! सध्याच्या युगात महाराजांसारख्या संतांचे सूक्ष्म रुपाने कार्य चालू आहे याचेच हे द्योतक आहे यात शंकाच नाही.
या निमित्ताने "अनुसंधान" वर भक्तमंडळींचा एक मेळा जमवावा व एकमेकांना भेटवावे असे मला वाटले. इच्छा "त्यां"ची, सेवा माझी.
आम्ही एक user profile तयार केली आहे. त्यात अगदी प्राथमिक माहिती विचारली आहे. जे जुने सभासद (भक्त) आहेत त्यांना त्यांची माहिती त्यात भरता येईल. जे नवे सभासद होऊ इच्छितात त्यांना सुरुवातीलाच माहिती भरता येईल.
कोणालाही केव्हाही त्यांची माहिती update करता येईल.
शिवाय फोटो देण्याचीही सोय करतो आहोत.
सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

॥श्रीराम समर्थ॥