श्रीरामगीतेच्या पठणाचे माहात्म्य



श्रीरामगीतेच्या पठणाचे माहात्म्य

. या गीतेचे संपूर्ण माहात्म्य श्रीशंकर जाणतात

/२ श्रीपार्वतीदेवी जाणते

/४ ब्रह्मदेव जाणतात (हे सर्व माहात्म्य ब्रह्मदेवाने मुनीश्रेष्ठ नारदांना (पुत्राला) सांगितले.)

हे संपूर्ण जाणणे आणि सांगणे मला शक्य नाही, जे जाणले की त्याच क्षणी चित्तशुद्धी होते.

. सर्व तीर्थे जे पाप नाहीसे करू शकत नाहीत ते श्रीरामगीतेने होऊ शकते.

. श्रीरामाने उपनिषदरूपी सागराचे मंथन करून ही अमृतमयी गीता लक्ष्मणाला दिली. हे अमृत प्राशन करणारा अमर होतो.

. पार्वतीच्या सान्निध्यात श्रीरामगीतेचे पठण करणारा परशुराम, नारायणस्वरूपाला जाऊन मिळाला.

. एक महिना पठण केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते.

. दुष्ट दानाचा स्वीकार, वाईट अन्नाचे भोजन, दु:शब्दांचा उच्चार यांमुळे निर्माण होणारे पाप या पठणाने नाश पावते.

. शालिग्राम शिळेच्या समोर, तुळशीच्या-अश्वत्थाच्या जवळ तसेच संन्याशाच्या समोर जो श्रीरामगीता वाचतो, पठण करतो त्याचे फळ शब्दातीत आहे.

. श्राद्धाच्या वेळी श्रीरामगीतेचे भक्तीपूर्वक पठण करीत जो ब्राह्मणांना भोजन घालतो, त्याचे सर्व पितर विष्णूच्या श्रेष्ठ पदाला पोचतात.

. एकादशीच्या दिवशी निराहार राहून, द्वादशीच्या दिवशी व्रतस्थ राहून अगस्त्य वृक्षाच्या मुळाशी बसून जो रामगीतेचे पठण करतो, तो (जणू) श्रीरामच आहे, या भावाने सर्व देवांकडून पूजला जातो.

१०. रामगीतेचे पठण हे दान / ध्यान /तीर्थस्थान यांना पर्याय आहे.

 

॥श्रीराम समर्थ॥