१४ सप्टेंबर

१४ सप्टेंबर

सत्पुरुषाची लक्षणे -

  • तो पुष्कळांना मनापासून आवडतो.
  • तो निःस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो.
  • दुसर्‍याला बुडविण्याचा दुष्टपणा तो करीत नाही.
  • जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तो त्याच्याशी वर्तन करतो.
  • कोणाचीही निंदा किंवा स्तुती करीत नाही.
  • मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा करीत नाही.
  • स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो.
  • दुसर्‍याच्या दुःखात तो सुख देण्याचा प्रयत्न करतो.
  • तो सहजावस्थेत राहतो.
  • उपाधींमुळे तो बांधला जात नाही.
  • त्याला सुख-दुःख बाधत नसल्याने तो समाधानी असतो.

- असा योगी मनुष्य मुक्त असतो. अशा लोकांना संत म्हणतात. भगवंताच्या प्रेरणेने व भगवंतासाठी संत कर्मे करतात. त्या कर्मांच्यापासून जगाचे कल्याण घडते. त्यांच्या प्रत्येक कर्मात प्रेम, दया, परोपकार, निःस्वार्थीपणा आणि भगवंताबद्दलची निष्ठा असते.

संतांवर श्रध्दा ठेऊन साधकाने कसे वागावे?

  • अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी.
  • आपले कुठे चुकते ते पाहावे.
  • रामाकडे कर्तेपण द्यावे आणि त्याच्या इच्छने वागावे.
  • संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे.
  • संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरू नये.
  • नामाविषयी फार चिकित्सा करीत बसू नये.
  • साधन करताना अभिमान दूर ठेवावा. रामाशी अनन्य झाल्याने ते शक्य होते.

॥श्रीराम समर्थ॥