लेखनाकरीता मदत

लेखन (टायपिंग) मदतीसाठी आवाहन

१६-१०-२०११

या वेबसाईटच्या वाचकांना माझा सप्रेम नमस्कार,

या वेबसाईटमध्ये अजून पुष्कळ लिहिणे बाकी आहे.
या कामाला जितका हातभार लागेल तितके हे काम पुढे जाईल.
अधिकाधिक वाचकांपर्यंत हे लेखन जावे ही महाराजांची इच्छा दिसते.
कोणतीही जाहिरात न करता दरमहा >४४५० वाचक या साईटला भेट देतात. त्याचे नियमित वाचक होतात. श्रीमहाराज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या अंतरंगात बदल घडवून आणतात.
त्यामुळे ही वेबसाईट हे महाराजांचे कार्य आहे.
हे काम होणे ही महाराजांची इच्छा आहे व आदेश आहे, असे मी मानते.
यात लेखक व लेखनिक यांना स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधण्याची सुसंधी आहे.

माझे तुम्हां वाचकांना नम्र आवाहन आहे की तुम्ही या कार्यात सक्रिय योगदान द्यावे.
जे वाचक मला सहाय्य करु इच्छितात त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क करावा.
फोन नं. ९३७१९३४५२० (वेळ स. ९ ते १२ व दु. ३ ते रात्री ७).
तुम्ही मला मेल करु शकता - rujutavinod@gmail.com

हे लेखनिक-सहाय्यक पुण्यातील असावेत.
त्यांना मराठी वाचन लेखनाची आवड असावी.
हे सहाय्यक परमार्थमार्गातील असावेत.
श्रीमहाराजांचे अनुग्रहीत असतील तर उत्तमच.
त्यांना बरहामध्ये टाईप करण्याची सवय असावी वा ते शिकण्याची त्यांची तयारी असावी.
त्यांची सोईची वेळ त्यांना निवडता येईल.

आपली शुभाकांक्षी,

ऋजुता विनोद