महाराजांची कुमारावस्था

महाराजांची कुमारावस्था

- आईच्या सांगण्यावरून ते रानात गाई चरायला नेऊ लागले.
- बरोबर मुलं असायची. त्यांना घेऊन चार दगड मांडून ते रामाचे भजन करीत.
- त्यांना भक्तांच्या गोड कथा सांगत.

- इकडे गाईंनी इतरांच्या रानात नासधूस केल्यामुळे खूप तक्रारी घरी आल्या. त्या ऐकून त्यांची आई खूप चिडली.
- महाराजांनी आपले वागणे बदलण्याचे आश्वासन दिले ते आईने नामाची लाखोली (१ लाखाचा संकल्प) वाहण्याचे कबूल केले म्हणून.
- त्यानंतर ते जास्तीत जास्त काळ ध्यानात राहू लागले.
-------------------
हे वाचून मला काय वाटलं?

- इतक्या लहान वयात सतत रामाचा ध्यास हीच गोष्ट मला विलक्षण - असामान्य वाटली. आपल्या बरोबर इतरांनाही रामनामाची गोडी लावण्याचे त्यांचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरु होते. इतक्या लहान वयात भगवंताचं ध्यान ते कसं काय लावत होते?
या सगळ्याचं एकच उत्तर मला वाटलं ते असं की - ही अवतार घेऊन जन्माला आलेली माणसं देह माणसाचा म्हणून माणसं म्हणायची पण ती असामान्यच. हे अवतारी संत आपल्या व्यवहारी सामान्य बुध्दीला नाही कळायचे. त्यांची आंतरिक अवस्था आपल्या समजण्याच्य़ा पलीकडची आहे हे मला समजलं.

॥श्रीराम समर्थ॥