महाराजांची अनन्य गुरूभक्ती

महाराजांची अनन्य गुरूभक्ती
-----------------
सद्‌गुरुसाठी वय १२ ते १४ या कुमारवयात महाराज भारतभर शोध घेतघेत हैदराबादकडे आले असता, श्रीसमर्थ परंपरेतील श्रीरामकृष्णांनी त्यांना येहळेगावला जाय़ला सांगितले. महाराज आधी नांदेडला गेले. तिथे त्यांनी गोदावरीत स्नान केले आणि ते येहळेगावच्या दिशेने जायला निघाले.

------------------------------
गुरुभेटीपूर्वी व नंतर -
- श्रीतुकामाईंना महाराज येणार हे आधीच समजले होते.
- महाराजांनी त्यांना गावात-रानात दिवसभर शोधले.
- शेवटी ते घराच्या भिंतीला टेकून बसलेले असता तुकामाई अचानक आले आणि त्यांनी एकमेकांकडे पाहताच ते दोघे खुणेचे वाक्य बोलले व आपला हेतू स्पष्ट केला.
- तुकामाईंना आनंदाचे भरते आले व त्यांनी महाराजांना प्रेमाने पोटाशी घेतले.
- महाराज संपूर्ण निःशंक झाले. त्यांचा शोध संपला.
-----------------------------------
महाराजांना तुकामाईंमध्ये जाणवलेले वेगळेपण -
- ब्रह्मनिष्ठा
- प्रेमळपणा
- निस्पृहता
- दीनवत्सलता
- अत्यंत आनंद, समाधान, शांति, बालभाव, असलेलं व्यक्तिमत्व
- खोट्या माणसांशी तुसडेपणा
- खर्‍या साधकाच्या/शरणागताच्या आधी कठोर कसोट्या घेऊन नंतर त्याचे जन्माचे कल्याण करणे
------------------------------------------
महाराजांनी केलेली गुरुसेवा -
- तुकामाई उठण्यापूर्वी उठावे
- एखाद्या सावलीप्रमाणे त्यांच्या मागे सदा असावे
- ते धावतील तिकडे धावावे
- ते जातील तिकडे जावे
- ते बसतील तेथे मागे उभे रहावे
- पडेल ते काम मोठ्या आवडीने करावे
- नदीवरून पाणी आणावे
- ते तापवून त्यांना स्नान घालावे
- पाटपाणी करून त्यांच्या जेवणाची तयारी करावी
- ते विश्रांती घेत असता त्यांना पंख्याने वारा घालावा.
- तुकामाईंनी सांगितल्याशिवाय़ जेवू नये
- रात्री त्यांचे पाय दाबून देताना त्यांना झोप लागली की त्यांच्या पायापाशी आपण बसावे
- तुकामाईंनी आज्ञा करायच्या आत त्यांना काय हवे ते ओळखून कृति करावी.
- ते जे सांगतील त्याचे लगेच जसेच्या तसे आज्ञापालन करावे (चर्चा नाही, सबबी नाहीत, नाही म्हणणे नाही, टाळणे नाही, विसरणे नाही, दुर्लक्ष नाही, वाद नाही, दिरंगाई नाही)
-------------------------------
बाह्य दृश्य परिणाम
- दिवसदिवस अन्नपाण्यावाचून गेले
- ९ महिने झोपेविना गेले
- सहनशक्तीची व श्रध्देची कसोटी लागली (तुकामाईंचे उलटसुलट वागणे - यथेच्छ निंदा/पोटभर स्तुति, प्रेम करणे/मार देणे, मऊ वागणे/झिडकारणे, अतिशय कठोर जीवघेण्या कसोट्या घेणे)
----------------------------------
महाराजांची आंतरिक स्थिती -
- महाराज १४व्या वर्षी भूक-तहान-झोप-शारीरिक वेदना-निंदा-स्तुति-मान-अपमान-श्वास घेणे सोडणे या सगळ्याच्या पलिकडे गेले. ते देहाभिमानशून्य झाले.
- त्यांना घराची-आईवडिल-बहिण-भाऊ-पत्नी-सगेसोयरे-मित्र कशाचीही आठवण आली नाही.
- त्यांचे मनाचे व्यापार स्तब्ध झाले.
- अंतःकरण संपूर्ण निर्वासन (हवे-नको च्या पलिकडे) झाले
- तुकामाईंशी संपूर्ण एकरूप ते झाले.
- संपूर्ण चित्तशुध्दी झाली.
---------------------
श्रीतुकामाईंनी केलेली कृपा -

- दोघांचा निःस्वार्थी, उत्कट, पवित्र, आणि निकट प्रेमाचा सहवास घडला
- महाराजांना आत्मज्ञान प्राप्त झाले (मी कोण, जग काय आहे, माझे व जगाचे नाते काय आहे?)
- ब्रह्मचैतन्य हे नामकरण झाले.
- गुरुंकडून रामोपासना मिळाली
- रामदासी दीक्षा मिळाली
- अनुग्रह देण्याचा अधिकार मिळाला.
- आजेगुरु श्रीचिन्मयानंदस्वामी यांचे आशीर्वाद मिळाले.
- तुकामाईंनी त्यांना आपले हृदय काढून दिले. (जसे वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाला, श्रीरामाने श्रीमारूतिरायाला)
------------------------------------
तुकामाईंनी महाराजांना दिलेला आदेश -
अ) लोकांसाठी -
- मध्यम स्थितीतील प्रापंचिक लोकांना परमार्थ शिकवणे
- राममंदिरांची स्थापना करणे व रामनामाचा प्रसार करणे
- श्रीसमर्थ रामदासस्वामींचे महत्व वाढविणे
- लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न करणे
- खर्‍या दीनांची सेवा करणे
- सर्व ठिकाणी प्रेमाचे वातावरण निर्माण करणे
ब) स्वतःसाठी मिळालेला आदेश -
- आत्मज्ञान मुरविण्या-जिरविण्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करणे व त्यासाठी हिमालयात जावे
- त्यानंतर मोठमोठ्या तीर्थांचे दर्शन घ्यावे
- त्यानंतर घरी जाऊन कुटुंबियांची भेट घ्य़ावी.
----------------------------------------
हे वाचून मला काय वाटले? –
प्रथम मला असं वाटलं की श्रीतुकामाईंच्या परीक्षेत उतरणं आपल्याला शक्यच झालं नसतं. ते काही येरागबाळ्याचं काम नाही. तेवढी पात्रता यायला किती जन्मांची पुण्याई हवी.
मात्र, मला केव्हा एकदा मी येहळेगावाला जाईन व तिथली माझ्या सद्‌गुरूंची व आजेगुरुंची चरणधुली मस्तकी लावीन असं झालं होतं. जवळजवळ ६ वर्षांनी म्हणजे ऑक्टोबर २०१० मध्ये काही सज्जनांबरोबर अचानक येहळेगावला जाणं झालं. तिथला तुकामाईंचा वाडा, त्यांचे समाधीस्थान, त्यांनी ज्या विहिरीत महाराजांना अनुग्रह दिला ती विहीर व आतील गुहा पाहिल्या. ती रात्र माझ्या दृष्टीने फार संस्मरणीय होती.

श्रीतुकामाईंची समाधी

श्रीतुकामाईंचा वाडा

समाधीमंदिर

श्रीतुकामाईंचे भित्तीचित्रं

विदर्भातलं हे एक अगदी छोटं खेडं आहे. मंदिराच्या आसपास विखुरलेली लोक वस्ती आहे. साधीसुधी शेतकरी व इतर व्यवसायातली माणसं आहेत. रात्री देवळात हरिपाठ ती करतात.

मंदिर व परिसर यांचा जीर्णॊद्धार चालू आहे. सर्वच परिसर जरा दुर्लक्षित आहे असं वाटलं.

अनुग्रह दिलेली विहीर व आतील गुहा

सकाळी येताना मी एक छोटी नदी पाहिली.

या नदीच्या पुरातच तुकामाई लहान असताना श्वास निरोध करून राहिले होते व हिच्या काठीच त्यांच्या सद्‌गुरूंनी येऊन त्यांना अनुग्रह दिला होता.

॥श्रीराम समर्थ॥