महाराजांनी केलेल्या तीर्थयात्रा व पर्यटन

महाराजांनी केलेल्या तीर्थयात्रा व पर्यटन
------------------
श्रीसद्‌गुरु तुकामाईंकडून आत्मज्ञान झाल्यावर) पायी केलेला प्रवास
अंदाजे १८५९ ते १९६६ (महाराजांचे वय १४ ते २१ अंदाजे ७ वर्षांचा कालावधी)
उमरखेड, उज्जैन, नैमिषारण्य. अयोध्या, काशी, प्रयाग, मथुरा, कलकत्ता, नर्मदातीर, इंदूर (६ महिने), वाटेतील तीर्थे करीत गोंदावले मारुतिमंदिर, सज्जनगड, श्रीरामेश्वर, तिरुपति व्यंकोबा, कांची वरदराज, येहळेगाव - घरी गोंदावले परत
---------------------------
१८७४ (१० महिने पायी प्रवास) महाराजांचे वय २९ ते ३०
सुरुवातीला प्रथम पत्नीसमवेत नंतर एकटे
येहळेगाव, नाशिक, इंदूर, काशी, अयोध्या, नैमिषारण्य, गोंदावले परत
---------------------
१८७७ ते १८९० पहिल्या पत्नीचा मृत्यू व द्वितीय विवाह झाल्यावर पायी प्रवास
(महाराजांचे वय अंदाजे ३२ ते ४५ - १३ वर्षांचा कालावधी)
पंढरपूर, अलिबाग, अबू जंगल, नर्मदातीर, महेश्वर, बुदनी, उज्जैन, इंदूर, येहळेगाव, गोंदवले परत
- अनेकवेळा काशीची कावड रामेश्वराला नेली
- भारतातील सर्व तीर्थे पाहिली
- पायी सबंध भारत तीनवेळा पालथा घातला
- एकदा फक्त साध्वी संत स्त्रियांचे दर्शन करण्याकरीता प्रवास केला
(त्यांना ३ स्त्रिया आढळल्या - १ मद्रासमध्ये, १ बंगालमध्ये, १ महाराष्ट्रात)
--------------------------
१८९८-९९ (महाराजांचे वय अंदाजे ५३-५४) १ वर्षाचा कालावधी
रेल्वेने केलेला प्रवास
निमित्त- आईची काशीयात्रा व इतर भक्तजनांची तीर्थयात्रा
कोरेगाव, नाशिक, प्रयाग, काशी, गया, अयोध्या, इंदूर, नैमिषारण्य, उज्जैन, इंदूर, हर्दा, नाशिक, गोंदावले
-------------------------------
१९०१ (महाराजांचे वय - ५६)
श्रीब्रह्मानंदस्वामींनी केलेले कार्य पहाण्यासाठी रेल्वे, बैलगाडीने केलेला प्रवास
गदग, बेलधडी, गदग, यावंगल, मुळगुंद, नरगुंद, शिरहट्टी, कुच्ची
----------------------
१९०५ ते १९०७/८ (महाराजांचे वय ६०-६२) कालावधी अडीच वर्षे
रेल्वेने केलेला प्रवास
निमित्त - भक्तजनांची तीर्थयात्रा, राममंदिरांची प्रतिष्ठापना
कोरेगाव, प्रयाग, काशी, अयोध्या, नैमिषारण्य, इंदूर, हर्दा, अयोध्या, नैमिषारण्य, हर्दा, लखनौ, अयोध्या, नैमिषारण्य, प्रयाग, हर्दा, गोंदवले परत
-----------------------------------
१९०९
महाराजांचे वय ६४
अनेक राममंदिरांची प्रतिष्ठापना, १३ कोटीजपयज्ञ सांगता इ.
मिरज, शेडबाळ, कागवाड, उगार, मुंबई, हुबळी, गोंदवले परत
-----------------
देहपात (महानिर्वाण १९१३ महाराजांचे वय ६८)
त्यापूर्वी पंढरपूरला १ महिना निवास
------------------------------------------------------------------------
हे सर्व वाचून मला काय वाटले?
चरित्राची असंख्यवेळा पारायणे झाली असतील.
एवढा प्रवास त्यांनी पायी कसा केला असेल? एक साधू म्हणून फिरत असता जनसामान्यांचे अवलोकन, त्यांचा उध्दार, त्यांच्याजोगती उपासना सांगून त्यांना परमार्थाला लावणं, दीन-नम्र-समंजस माणसांना मदत करणं हे त्यांचे हेतू होते.
अयाचित वृत्ती, निस्पृहता, रामदासी हीच ओळख हे मला विशेष भावलं.
----------------
महाराजांनी केलेल्या तीर्थयात्रा वाचून मी फार आनंदित होते.
त्यांची चरणधुली लागलेली सर्व ठिकाणे पहाणे अशक्य आहे पण महत्वाची क्षेत्रे पहाण्याची माझी हौस महाराज पुरी करत आहेत.
मी ठरवून काही होत नाही हे लक्षात आलेले आहेच.
त्यांनी ठरवले की प्रवास निर्विघ्नपणे पार पडतो व मनासारखं देवदर्शन होतं.
सर्व ठिकाणी महाराजांची फार आठवण येते. ती सतत असतेच पण तीर्थयात्रेत ती जास्त तीव्र असते. घरच्यापेक्षा नामस्मरण सातत्याने होते.
प्रत्येक यात्रेत वेगळी माणसे भेटतात, नवीन मुलुख असतो, प्रत्येक देवस्थानाचे अनुभव वेगळे असतात.
माझ्यातील दोषदर्शन होते.
मी कोणी विशेष हा भाव कमी होऊन मी एक सर्वसामान्य यात्रिक व महाराजांवर विलक्षण लोभ असलेली एक प्रापंचिक महिला एवढीच ओळख रहाते.
अनावश्यक गप्पा, नावे ठेवणे, दंगा, गाणी, ओळखीपाळखी यापासून मी लांब रहाते.
नामस्मरण व नित्यपाठ यात जीव रमतो.

॥श्रीराम समर्थ॥