महाराजांचा लोकसंग्रह
--------------------------
एकांताची अतिशय आवड असूनही सद्गुरुंच्या आदेशाखातर महाराजांनी रामनामाचा बाजार मांडला. रामनाम सर्वांनी प्रेमाने आवडीने घ्यावे यासाठी पुष्कळ लीलाविग्रह केले. जेणेकरुन चिकित्सक लोकांना प्रचिती येईल व नामस्मरणाचे महत्व पटल्याने ते करु लागतील.
जसे डॉक्टरकडे रोगी/आजारी/रंजलेगांजलेले जातात तसे त्यांच्या कडेही येत असत.
आधिदैविक, आधिभौतिक, पारमार्थिक सर्व प्रकारच्या अडचणींवर महाराजांकडे उपाय होते.
काही जण काही नसतानाही त्यांच्या भोवती असत.
येणार्या/राहणार्या माणसांचे वर्गीकरण
- मूल व्हावे म्हणून
- लग्न होत नाही म्हणून
- बायकोला पिशाच लागलेय म्हणून
- महारोग/क्षय/कुष्ट/प्लेग इ रोग बरे व्हावे म्हणून
- महाराजांची सेवा करावी म्हणून
- योग शिकावे म्हणून
- महाराजांच्या मांडीवर मृत्यू यावा म्हणून
- इथे रहात असलेल्या लोकांकडच्या वस्तूंची चोरी करता यावी म्हणून
- घरात अन्नाचा कण नाही म्हणून
- खूप म्हातारपणी कोणी सांभाळायला नाही म्हणून
- स्वयंपाकघरात पाकसिध्दीचे काम करायला मिळावे म्हणून
- गोशाळेत गाईंची सेवा करण्यासाठी
- मंदिरांची झाडलोट, शेण लावणे इ. साठी
- लाकडे फोडणे, ओढ्यावरुन पाणी आणणे इ करण्य़ासाठी
- विविध मंदिरे, धर्मशाळा यांचे बांधकाम करण्यासाठी
- विहिरी खोदण्यासाठी
- १३ कोटी/ १३ लाख इ. जपाचा संकल्प केल्यावर त्याच्या अनुष्ठानासाठी
- विविध वैदिक कर्मे करण्यासाठी
- महाराजांचे रोजचे निरुपण ऐकण्यासाठी
- मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी
- विविध उत्सवांसाठी
- लग्ने, मुंजी, बारशी, डोहाळजेवणी, विविध नेमधर्म इ साठी
- महाराज "आता यावे" असं सांगत नाही म्हणून
- फक्त उपासनेसाठी
-------------------------------------------------------------
हे वाचून मला काय वाटले?
• मी कितीतरी वेळा त्यातल्या गमतीशीर प्रसंगात स्वतःला गोवून कल्पना केली आहे. अशाप्रकारे महाराजांचा काळ, त्यांच्या सन्निध्यात आलेली माणसे, घडलेले मज्जेशीर प्रसंग माझ्यापुरते जिवंत झाले आहेत.
• महाराजांची आंतरीक अवस्था न कळल्याने मी कसा मूर्खपणा केला असता असेही मनात खूपदा येऊन जाते.
• महाराजांकडून जे महत्वाचे घ्यायचे ते न घेता कदाचित मी वाद घातला असता, त्यांच्या वागण्याने विकल्प करून घेतला असता असे मला नेहेमी वाटून जाते.
• ज्या थोर भक्तांनी महाराजांची योग्यता ओळखली, त्यांच्या सहवासाचा लाभ घेतला त्यांच्या विषयी मला धन्यता वाटते.
॥श्रीराम समर्थ॥