महाराजांकडचे अन्नदान

महाराजांकडचे अन्नदान
---------------------
१८४५
महाराजांचे नामकरण - त्यांच्या आजोबांनी खूप केलेले अन्नदान
१८५०
आजोबांनी परीक्षा घेण्यासाठी विचारले - तुला राजा केले तर तू काय करशील?
पाच वर्षांचा हा छोटा मुलगा तात्काळ म्हणतो - "मी अन्नछत्र घालेन - सर्व गोरगरीब-अपंग सर्वांना जेवायला घालेन. कोणाला उपाशी ठेवणार नाही." (असं फक्त रामराज्यातच होतं म्हणतात)
१८५५-५६
महाराजांचा विवाह - आजोबांनी ८ दिवस ४००-५०० माणसे जेऊ घातली होती
१८६०-६१
महाराज आत्मानुभवानंतर तीर्थाटन करताना कलकत्त्याला हरिहाट - ८ दिवस रोज अन्नछत्र
१८६६
महाराजांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात करताना गोंदावल्याला झालेलं होमहवन-अन्नदान
१८७६-७७
भयानक दुष्काळ - रोज दीड हजार माणूस जेऊन जाई. राजा सुध्दा करणार नाही असं अन्नदान झालं
१८९१
थोरले राममंदिर प्रतिष्ठापना - आधी भजनसप्ताह, नंतर उत्सव
- विद्‌वान, पंडित, वैदिक ब्राह्मण (काशी, गया, प्रयाग, अयोध्या, पुणे, वाई, सातारा, कर्‍हाड, हुबळी, धारवाड इ. ठिकाणाहून आलेले) - भोजन, १ रेशमी वस्त्र, १ होन (सुवर्णमुद्रा)
- ऋणानुबंधी - भोजन, १ उपरणे
- कामगार - भोजन, १ धोतर, १ मुंडासे, ५ रू (दीडशे वर्षापूर्वीचे)
- सुवासिनी - भोजन, खणानारळाने ओटी
- शेवट्च्या दिवशी १०,००० माणूस जेवलं

१८९२ ते ९८ दरम्यान
धाकटे राममंदिर प्रतिष्ठापना
१ गायत्री पुरश्चरण, रुद्रस्वाहाकार
८ दिवस अन्नछत्र

१८९८-९९
आई व १०० जण बरोबर घेऊन केलेली तीर्थयात्रा
काशी -
५ सहस्रभोजने
३ इच्छाभोजने
काशी गावातील सर्व भिकार्‍यांना ५ भोजने
३ संन्यासीभोजने
आईच्या हाताने वस्त्र व पैसा यांचे अगणित दान
अयोध्या
सबंध अयोध्येतील भिकारी, गरीब, बैरागी, वैदिक यांना गावजेवण, अगणित रुपयांचे दान
आई गेल्यावर - १० व्या दिवसापासून १३ व्या पर्यंत
- असंख्य गरिबांना अन्नदान
- १०० गाई दान
- १०० वैदिकांना वस्त्रे व पात्रे
- १०० सुवासिनींना लुगडे
- प्रत्येक भिकार्‍याला १ घोंगडी
इंदूर
आईच्या वतीने गावजेवण, दक्षिणा
१८९६
दुष्काळ
शेतात काम करेल त्याला रोज १ वेळचे जेवण
म्हातारेकोतारे - रोज धान्य वाटप
१०००० जप करणार्‍याला एक वेळचे जेवण
विप्र (अनुष्ठान करणारे) - १ वस्त्र, रोज १ वेळचे जेवण
१८९७
श्रीरामरायाच्या डोळ्यांतून अश्रुपात
अन्नदान
१९०५
तीर्थयात्रा
प्रयाग (नाव उलटण्याचा प्रसंग)
- नावाड्यांना वस्त्र, नारळ, रुपये
- अन्नदान
- प्रयागातील भिकार्‍यांना खीरपुरीचे जेवण
काशी
- विश्वेश्वराला नैवेद्य (जिलेबी) दु. १२ ते रात्री ८ पर्यंत पंगती
- १०० शास्त्री-पंडितांना भोजन, १ वस्त्र

गोंदावले
कित्येक गरीब घरातील मुलांच्या मुंजी लावल्या, लग्ने लावली, बारशी केली

१९०७ ते १९१३ (वय ६२ ते ६८)
- रोज अन्नदान (किमान ५०० पाचशे माणूस)
- दर आठवड्याच्या बाजा्राच्या दिवशी गावजेवण
- वर्षातून सतत उत्सव त्यानिमित्त अन्नदान
मिरज
- गावजेवण
- सर्व सुवासिनींना भोजन, प्रत्येकी १ लुगडे
- सर्व भिकार्‍यांना खीरीचे भोजन व १ रु दक्षिणा
१९१३
रामनवमीचा उत्सव
१० दिवस अन्नदान
पारण्याला १०००० पान

॥श्रीराम समर्थ॥