महाराजांनी मुक्त केलेले विविध योनीतील जीव

महाराजांनी मुक्त केलेले/वाचवलेले विविध योनीतील जीव

- श्री नानासाहेब पेशवे (नैमिषारण्य) १८६० ते १९०६
- अयोध्येचे रामशास्त्री
- बंगालचे जमीनदार घराणे
- काशीचा कोट्यधीश व्यापारी
- इंदूरचा गवळी

- इंदूरचे जमीनदार व त्यांचे कुटुंब
- हिमालयातून योगविद्या शिकायला आलेला बैरागी
- रामेश्वरच्या वाटेवरचा मरणाच्या दारातला यात्रेकरु/भिकारी
- प्रथम पत्नी
- महेश्वरचे तामसी मांत्रिक
- उज्जैनचा एक सरकारी अधिकारी
- इंदूरचा प्रोफेसर
- भय्यासाहेब मोडक
- श्रीआनंदसागर
- हल्ल्याळचा एक लहान मुलगा
- दुसंगेबाईचा मुलगा
- बताशा घोडा
- लंगडी गाय
- म्हातारी मावशी
- परभणीचा जमिनदार
- कर्‍हाडचे आबाजीपंत
- विठाबाईच्या लग्नात अचानक मृत झालेले घोडे
- स्वतःची आई
- काशीचे आत्मानंदसरस्वती
- शांताश्रमस्वामी
- महारोग्याला (सोंग घेतलेल्या शांताश्रमस्वामींना) आलिंगन देऊन आपली गंगामाईच्या पावित्र्याबद्दलची निष्ठा व्यक्त करणारा शेतकरी
- गंगेकाठी महामारीने मरणाच्या दारात पडलेली एक लेकुरवाळी भिकारीण
- कागवाडचे आप्पासाहेब पटवर्धन
- इंदूरचे एक शास्त्रीबुवा
- नर्मदातटाकी गुहेत रामावतार होण्याची वाट पहात कित्येक युगे जीव धारण करून राहिलेला एक योगी
- वर्‍हाडातले विष्णुबुवा कुंभारे
- गोंदवल्याला उन्हाळ्यात थकून मरणाच्या दारात पडलेले गाढव
- वामनराव पेंढारकरांचा मुलगा
- पंढरपूरचे बाळकोबा परिचारक
- जमखिंडीचा तरुण डॉक्टर
- कोरेगावच्या शेतकर्‍याची बायकोला लागलेले वाखरीच्या दामोदरभटाचे पिशाच
- खातवळच्या पाटीलबाबांचा साठीत झालेला मुलगा
- पडक्या घरातील एक वाटसरु
- जुन्या पिंपळाखाली ओंडका कापणारी दोन माणसे
- लहान गोंदवल्याला राहाणारा महाराजांचा दूरचा नातेवाईक
- द्वितीय पत्नी
- गोमेवाडीचे पाटील
- वासुदेव फडक्यांचा मुलगा शिवाजी
- भुकेने तहानेने खंगलेली एक गाय
- प्रयागला वेणीदानासाठी नावेत बसलेले ४०-५० जण
- भवानराव
- गंगेत बुडणारा एक मुलगा
- काशीच्या वेदान्ती पंडिताचा भाऊ
- दहिवडीची जानकीबाई - अयोध्येला
- कसायाच्या तावडीतून सोडवलेल्या शेकडो गायी
- नियमाने एकादशी करणारे कुत्रे
- त्यांच्या मागे चारापाणी सोडून राहाणारा बैल
- औंध राजघराण्यातील एक पांगळी स्त्री
- बाळंतपणात अडलेली एक महारीण
- हरिगावच्या देशपांड्यांचा मुलगा
- रंगोपंत पोफळे यांच्य़ा बायकोच्या अंगात येत असलेले बन्या धनगराचे पिशाच
- सवतीला लागलेले पिशाच
- जत संस्थानातील रघुनाथराव फडणीस यांच्या बायकोला लागलेली ८-१० पिशाचे
- आटपाडीच्या पिलाजीपंत देशपांडे यांच्या घरातील समंध
- मोरगिरीच्या सरस्वती केळकरांना लागलेला ब्रह्मचारी पिशाच
- आप्पा धनगर
- पुण्याचे पोतनीस
- कागवाडची संताबाई महारीण
- हुबळीची जानकीबाई
- बिदरहळ्ळीची एक मरणोन्मुख म्हातारी
- श्रीतुकाराममहाराजांचा एक दूरचा वंशज
-------------------------------------------------
हे सर्व समजून घेऊन मला काय वाटले?

सुरुवातीला पिशाच्चे-भुते यांच्याबद्दल वाचताना मला चांगलीच भीती वाटली होती. महाराज ज्याप्रकारे या अदृश्य जीवांशी संवाद साधीत व त्याचे कल्याण करीत ते पाहून तर मी फारच भारावले होते. त्यांच्यातील दया, करुणा, मैत्रभाव यांचे मला दर्शन झाले.
मृत्यूच्या समयी प्रदीप्त असलेल्या माणसाच्या अतृप्त वासना, हेवा, मत्सर, द्वेष, सूडबुध्दी्मुळे त्याला मृत्यूनंतर पिशाचयोनीमध्ये जाणे भाग पडते. पृथ्वी व स्वर्ग यामध्ये असलेल्या अंतरिक्षात अशा सूक्ष्म जीवांचे वास्तव्य असते. या योनीत देह नसल्याने ते स्वतः कोणतेही भोग घेऊ शकत नाहीत. ते कमकुवत माणसाच्या कमकुवत मनात प्रवेश करतात व त्याच्या मनावर नियंत्रण करून आपल्या वासना तृप्त करुन घेण्याचा प्रयत्न करतात. अशी पछाडलेली माणसे असहाय्य असतात. ती संसारात सुखी होऊ शकत नाहीत. त्यांच्या विचित्र वागण्यामुळे त्यांच्या घरच्या माणसांना खूप त्रास होतो. मग असे नातेवाईक अनेक उपाय करतात. त्यातील एक उपाय म्हणजे संताच्या चरणी पीडित व्यक्तीला घालणं.

संत अशा देहात वस्ती करून राहिलेल्या जीवाकडेही करुणेने पाहतात व त्याला त्याच्या यातनांतून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. तो स्वतः प्रयत्न करून मुक्त होऊ शकत नाही. तेव्हा पछाडल्या गेलेल्या व्यक्तीने जर संताने सांगितल्याप्रमाणे रामोपासना चालू ठेवली तर कालांतराने पिशाच सोडून जाते वा त्याचा जोर कमी होतो. महाराजांनी पिशाचांशी दिवसेंदिवस चर्चा करून त्याला आपली सूडबुध्दी सोडायला लावली होती. जर एखाद्या त्यांच्या भक्ताला पिशाच त्रास देत असेल व त्या भक्ताने त्यांना हाक मारली तर सूक्ष्म रुपात महाराज जाऊन त्याचे रक्षण करीत असत. संतकृपा किती कल्याणकारक असते!

“पिशाच्चे वागवीत असलेल्या माणसांचे मन हे उघड्या दाराप्रमाणे असते”, हे महाराजांचे वाक्य माझ्या चांगलेच लक्षात राहिले. भीती वाटायला लागली की श्रीमारुतिस्तोत्र, श्रीरामरक्षा का म्हणतात हे मला समजलं.
त्यानंतर यात्रेत अंधारात, आडभागातून गाडी जात असताना महाराजांचे स्मरण व रामनाम याची आठवण मला होते.
भूतयोनी असते की नाही की ही मानवी मनाची कल्पना आहे? या वादावर पडदाच पडला. एकदा त्यांनी सांगितले…पुढे प्रश्न येत नाही. मी कोणाशी याविषयी वादही घालायला जात नाही.

॥श्रीराम समर्थ॥