सर्वाभूती रामराया दिसणं

सर्वाभूती रामराया दिसणं
----------------
- सर्वच ठिकाणी रामराया कसा भरुन राहिला आहे असे महाराज म्हणत असत
- प्रत्येक जड-चेतन वस्तूकडे बघताना त्यांना त्यात परमात्मा दिसत असे.
- शरण आलेल्या व अनुग्रहासाठी आलेल्या, शिष्यत्व घेणार्‍यामध्ये सुध्दा ते रामालाच पहात असत.

- राम आपल्याला जेवायला देतो, आपला सांभाळ करतो असे महाराज म्हणत असत.
- सर्व रामरायावर सोडले तर त्याला आपली काळजी लागते..असे ते सांगत असत.
- उठल्यापासुन ते झोपेपर्यंत सर्ववेळ रामनाम घेतले तर मृत्यूसमयी आपले कल्याण तोच करतो असे महाराज सांगत असत.
- महाराजांना कधी काही कमी पडले नाही. त्यांनी कोणापुढेही काही मागितले नाही. कोणालाही ते मिंधे झाले नाहीत. गरीबीतली गरीबी, आणि ऐश्वर्यातले ऐश्वर्य उपभोगताना सुध्दा "हे सर्व रामरायाचे देणे आहे" असे ते म्हणत असत.
- सर्व घडामोडींमध्ये ते रामाचा हात पहात असत.

॥श्रीराम समर्थ॥