संतांनी सांगितलेले कुळधर्माचे महत्व

संतांनी सांगितलेले कुळधर्माचे महत्व -
---------------------
श्रीतुकाराममहाराज -

  • जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो, त्याला ज्ञान प्राप्त होते.
  • त्याच्याकडून साधन होते.
  • त्याच्या कुळधर्मामुळे त्य़ाच्या हाती ज्ञानाचे निधान येते.
  • त्याच्या हातून भक्ती होते.
  • त्याला उत्तम गती मिळते.
  • तो दुसर्‍यावर दया करून उपकार करतो. त्याचा तो कुळधर्मच त्याच्या साधनांचे सार आहे.
  • कुळधर्म त्याला महत्व व मान प्राप्त करून देतो आणि परलोकी पावन करतो.
  • कुळधर्म त्याला देव-देवतांचे दर्शन घडवतो.
  • याप्रकारे कुळधर्माप्रमाणे आचार करणार्‍याची ऐहिक व पारमार्थिक उन्नती होते.

-------------------------------
श्रीज्ञानेश्वरमहाराज -

  • आपल्या कुळातील आचारांचे आचरण करावे.
  • शास्त्रानी जी कर्मे कर असे सांगितले आहे ते करावे.
  • शास्त्रांनी जे करू नको असे सांगितलय के करू नये.

म्हणजे सुख मिळेल.
------------------------------------
श्रीसमर्थ रामदास -

कुळधर्म व कुळाचार जसे परंपरेने चालत आलेले आहेत, तसे सुरु ठेवावेत. मग ते उत्तम असोत वा मध्यम असोत.
जर क्षुद्र देवतांची (जाखमाता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी) पूजा कुळधर्मात असेल तर तीही करावी.

॥श्रीराम समर्थ॥