पंचायतनपंचायतन कलियुगापूर्वी ईश्वरीतत्वाची पूजा - ध्यान, वैदिक मंत्रांनी अर्चना होत असे. कलियुगातील माणूस अल्पमती, अल्पबुध्दी, अल्पआयुषी असल्याने मूर्तीपूजा आली. आद्य शंकराचार्यांच्या अवतारकार्यामध्ये सर्व पंथांना एका छत्रामध्ये आणणं व त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य होते. त्याकरीता ते त्यांच्या अल्प आयुष्यामध्ये अखंड भारत (अफगाणीस्तानापासून म्यानमारपर्यंत) पायी प्रवास करून विविध पंथांतील मुख्य अधिकारी व्यक्तींशी संवाद साधला. अद्वैताचा प्रसार करणारे आद्य शंकराचार्य प्रसंगी विविध जागृत देवतांपुढे उभे असताना उत्स्फूर्तपणे सुंदर संस्कृत स्तोत्रे म्हणून आळवीत असत. शेकडो पंथातील प्रमुख ५ एकत्र करून त्यांनी पंचायतनाची संकल्पना मांडली व तिचा तत्कालीन गृहस्थांमध्ये शास्त्रशुध्द प्रचार व प्रसार केला. प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाने सूर्य, गणपति, देवी, शंकर, आणि विष्णू अशा क्रमाने पांच देवतांची पूजा करावी असे मत्स्यपुराणात सांगितले आहे. ह्याला पंचायतन म्हणतात. या पंचायतनात एक प्रधान देवता असते, उरलेल्या ४ उपदेवता असते. त्या देव्हार्यात तांब्याच्या किंवा चांदीच्या संपुष्टात (तबकात) विशिष्ट स्थानी या देवतांची प्रतिष्ठापना करायची असते. प्रत्येक पंचायतनाविषयी खालील लिंकमध्ये चित्रे दिलेली आहेत. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |