इतर युगांविषयी माहिती हवी असल्यास http://www.anusandhan.org/node/41
----------------------------------------------------
कलि युगाचे वैशिष्ट्य:
कालावधी वर्षे - ४ लक्ष ३२ हजार
धर्माचा एकच पाद शिल्लक - दान
--------------------------------------------------
सर्वसाधारण स्थिती -
राजे (शासनकर्ते) - दुर्बल होतील, प्रजेकडे भिक्षेची याचना करतील
प्रजा -
-----------------------------------------------------
प्राण - अन्न (जगण्यासाठी अन्नाची गरज भासेल)
-------------------------------------
नामसंकीर्तनाने मायेच्या बंधनांचा त्याग शक्य होईल.
----------------------------------------
कलीचा शिरकाव
कौरव-पांडव यांच्यातील धर्मयुद्धानंतर कलियुगाच्या सुरुवातीला झाली. त्यात कुरुकुलाचा व यादवकुलाचा नाश झाला. धर्मराज, त्यांची भावंडं व पत्नीसह स्वर्गारोहणासाठी गेले. त्यांचे वंशज त्यांचे राज्य चालवू लागले. परिक्षित राजा धर्माने राज्य करीत होता. कलियुग सुरु होऊनही कलिचा प्रवेश झाला नव्हता.
ब्रह्मदेव व कलि यांच्यामध्ये याविषयी संवाद झाला. कलिने शिरकाव करण्यासाठी व सर्व लोक प्रभावित करण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने -
यांच्याद्वारा कलिला माणसांच्या मनात प्रवेश करता येईल असं सांगितलं. कलिने लीलया अल्पावधीत स्वत:ची सत्ता स्थापित केली.
काळ अनंत आहे. साक्षात परमात्म्याची ती विभूती आहे. कलि हे त्याचे एक रूप आहे. त्याच्या रूपामध्ये दान्वासारखे मुख, काळा वर्ण, जीभ व लिंग दोन्ही हातांनी झाकलेले हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
जो मनुष्य जीभ व लिंग ताब्यात ठेवेल त्याला मी त्रास देणार नाही, असे कलिचे वचन आहे. जो हरिनाम घेतो त्याची जीभ व लिंग ताब्यात राहाते. बाकीच्यांचा बुद्धीभेद व बुद्धीनाश होतो.
------------------
कलियुगात वरवर पाहाता सुविधा, सुबत्ता, चैन, करमणूक इ. दिसते.
मात्र खोलवर पाहाता घराघरांतून हे चित्र दिसते -
---------------------------------------------
जीभ - वेळीअवेळी नको ते नको एवढे अन्न खाणे, अनावश्यक निरर्थक बडबड करणे
लिंग - अतिरिक्त कामवासना, व्याभिचार, बलात्कार
--------------------------------------
जिभेवरचा ताबा सुटलेला -
(अ) वाचा -
आधीच्या युगात उचारलेल्या शब्दांना किंमत होती. शाप-उ:शाप-आशीर्वाद खरे ठरत असत. मंत्रोच्चाराने वातावरणात फ़रक पडत असे.
कलियुगात धर्माच्या वृद्धीसाठी पोषक परिस्थिती राहात नाही. अश्रद्धा, नास्तिकता यांचा कडेलोट होतो. कलीने सर्वसामान्य जनमानसावर कब्जा मिळवल्यावर आपण जिभेने काय बोलतो याचे भान ठेवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे भागवत पुराणात वर्णन केलेल्या अंत्यजाच्या आचरणाबरोबरहुकूम बहुतांशी लोकांचे आचरण होऊ लागते.
- सर्रास खोटे बोलणे
- कामाची टाळाटाळ करणे (खोट्या सबबी सांगणे.)
- चोरी करणे (स्वत:च्या घरी, बाहेर)
- गुह्य भागाबद्द्ल उघडपणे उच्चार करणे (शिव्या देणे ही फॅशन)
- आई-वडील, गुरु, शिक्षक यांना फ़सवणे
- दिलेला शब्द फ़िरवणे, न पाळणे
- अनावश्यक, अतिरेकी, अनाठायी, असभ्य बोलण्याची सवय असणे
- सतत निरर्थक बोलत राहाण्याचे व्यसन असणे (फ़ोन, मोबाईल, PC वरचे chatting, करमणुकीचे सतत कार्यक्रम, बाष्कळ द्वयर्थी विनोद)
असत्याचे आभासात्मक चित्रण, भ्रामक समजुती, कल्पना, यांच्या पडघमात सर्व अडकलेले दिसतात.
-------------------------------------------
रसना - पूर्वीच्या युगात नुसत्या वायुभक्षणाने, पाणी पिऊन, कंदमुळे खाऊन हजारो वर्षे ऋषी, मुनी, तापसी न हलता, एकांतात ध्यान करू शकत.
प्रत्येक युगात विविध ठिकाणी प्राण असतो -
सत्य - अस्थि
त्रेता - वायू
द्वापार - पाणी
कलि - अन्न
----------------------------
जिभेचा खाण्यासाठी उपयोग -
मांसाहार - कधीही, कोठेही, कोणताही, कोणीही आणि कितीही;
कलियुगात एकंदरीत शरीराची ताकद कमी कमी होत जाते. तपश्चर्येसाठी लागणारे शारीरिक-मानसिक सामर्थ्य राहत नाही. अन्नासाठी जीव कासावीस होतो.
नद्या, वायू, जमीन सर्वच प्रदूषित होत जाते. निर्माण होणार्या अन्नातला कस कमी होत जातो. खाऊन मनाची तृप्ती होऊ शकत नाही. अन्नाचा विक्रय सुरू होतो.
घरात सात्विक अन्न शिजवणे कमी होत जाते. गृहिणी अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते.
बाहेरचे चटापटीत, तिखट, तीक्ष्ण, आंबट अन्न खावेसे वाटते. कोठेही, केव्हाही, कितीही खाल्ले तरी मनाची तृप्ती होत नाही. अन्नाविषयी अतिरेकी आवड-निवड निर्माण होते. मन अन्नाभोवती सतत रेंगाळत राहाते. आधी पोटोबा मग जमले तर विठोबा अशी समाजधारणा होत जाते. अन्नसेवनाचे कोणतेच नियम पाळले जात नाहीत. अन्नामुळे मन बनते. त्यामुळे मन सतत चंचल, बेचैन, अशांत, असमाधानी राहाते.
----------------------------------------
(ब) सदाचारातून दुराचाराकडे बहुतांची वाटचाल -
देवधर्माविषयीचा आदर, भीती नाहिशी होते.
आपण करीत असलेलं कृत्य, आपल्या पारलौकिक हिताचं आहे की नाही, हे समजत नाही.
कोणाला विचारावसं वाटत नाही.
त्याचा विचारही करावासा वाटत नाही.
आत्ताची वासना तृप्ती महत्त्वाची वाटते. त्यासाठी कोणत्याही साधनाचा अवलंब करायला काही वाटत नाही. पुढचं पुढं बघू, असा विचार बोकाळतो.
---------------------------------
लिंगवासना -
१) निर्वासना/संयत वासना -
अविवाहित, ब्रह्मचारी (कोणत्याच अवस्थेत वासना नसणे), विवाहसंबंधातील जोडीदाराशी आवश्यक तेवढी संयत कामपूर्ती (विवेकी वैराग्य परमार्थाला आवश्यक)
-----------------------
२) अनियत मानसिक वासना -
अविवाहित, ब्रह्मचारी मात्र स्वप्नात संभोग
अविवाहित, पण जागृत अवस्थेत मनाने संभोग
------------------------------
३) अधोगति -
----------------------------------------------------
उपाय -
पाप कोणत्याही पातळीवर असलं तरीही
पश्चात्ताप, परिमार्जन
गुरुचा अनुग्रह,
कठोर तपस्या,
केवळ नामसंकीर्तनाने माणसं तरतील.
------------------------------------------------------------
कलियुगात माणसांची एवढी प्रमाणाबाहेर संख्या का होते? याविषयी शोध घेताना मी असे वाचले की आधीच्या तीन युगात जीवाला मनुष्यजन्म महामुष्किलीने मिळत असे. त्यामुळे पर्वत, नद्या, सरोवरे, मांसाहारी व शाकाहारी पशू-पक्षी-वनस्पती-जलचर-कीटक-सूक्ष्म जीव (कॄमी) यांची संख्या पृथ्वीवर खूप होती. निबिड जंगले, वने, उपवने यांची रेलचेल होती. वनात राहणार्या भिल्ल-किरात इ ची संख्या बरीच होती. बहुसंख्य गावे अगदी छोटी होती. नगरे तर बोटावर मोजण्याइतकी होती. वर्णाश्रम हे माणसांच्या गुणांवर आधारीत होते. प्रत्येकासाठी मोक्ष उपलब्ध होता, मात्र साधना वर्णाश्रमानुसार असायची.
एवढ्या न मोजता येण्याजोग्या जीवांना मोक्षाची संधी फक्त मनुष्यजन्मातच मिळते. तेव्हा सर्व जीव भगवंतापाशी गेले व त्यांनी मोक्षासाठी संधी देण्याची विनंती केली. तेव्हा, कलियुगात अशी संधी जास्तीत जास्त जणांना मी देईन. मात्र धर्माचरणासाठी आवश्यक वातावरण त्यावेळी नसेल. सर्वांना सोपा मार्ग - नामस्मरणाचा मार्ग मी उपलब्ध करून देऊन....हे भगवंताचे वचन आहे.
त्यामुळे नरक, पाताळ, भूतयोनी, पितरयोनी, देवयोनी, इतर असंख्य योनींमधून जीव कलियुगात मनुष्यजन्म मिळवतात.
याच कारणाने कधी दिसणारी हिंसा, वामाचार, शारीरिक मानसिक विकृती, अपमृत्यू, पशूपक्षीवनस्पती यांचे नामशेष होणे, पर्वत फोडून काढणे, खाणीतून खनिजे काढणे, नद्या आटणे, सरोवरे नाहीशी होणे, हिम वितळणे, सतत निसर्गचक्राचे संतुलन जाणे या घटना घडतात.
हे वाचल्यानंतर माझी स्वतःची तगमग खूपच कमी झाली? हे असे का? याचे उत्तर मिळाल्यावर आसपासच्या घटनांकडे मी कलिकालाच्या दृष्टीकोनातून बघू शकते.
हे काहीच नाही इतकी भीषण परिस्थिती पुढे येणार आहे. माणसे अंगुष्टमात्र होणार आहेत. १५ वर्षांचे आयुष्य होणार आहे. पाचव्या वर्षी मुले होणार आहेत. शेवटी माणसे माणसाला खाणार आहेत...अशीही वर्णने आहेत.
------------------------------------------------------------
सर्वांत चांगला भाग -
जो सद्गुरुला शरण जाऊन त्यानं दाखवलेल्या मार्गाने उपासना करीत अखंड हरिनामस्मरण करेल त्याला खर्चिक, कठीण, क्लेषाचे इतर कोणतेही मार्ग मोक्षासाठी वापरण्याची गरज भासणार नाही.
जो दानधर्म सात्विकतेने करील त्याला पुण्य मिळेल.
अन्नदानाचे महत्त्व खूप आहे. (जो परतफेड करु शकणार नाही, जो परावलंबी आहे, जो भुकेला आहे, जो जेवायच्या वेळेला आलेला आहे अशांना व, पितर-संन्यासी-ब्राह्मण-देवता-पशूपक्षी यांना ताजे अन्न प्रेमाने खाऊ घालणे).
यात स्वार्थासाठी पार्ट्या देणे अपेक्षित नाही.
भक्तीमार्गाने सर्व वर्ण, सर्व आश्रम, स्त्रिया, महापापी सुद्धा तरतील असे भगवंताचे वचन आहे