दैनंदिन पूजाविधी

नित्यकर्म - (दैनंदिन पूजाविधी)
नित्य (जे कायम असते ते - भगवंत) + कर्म (त्याच्या प्राप्तीसाठी करायचे साधन)

----------------

यामध्ये -
* सूर्योदयापूर्वी -
- ब्राह्ममुहुर्तावर उठणे (सूर्योदयापूर्वी २-३ तास)
- देवाचे स्मरण करणे, देवापुढे दिवा लावणे
- सद्गुरूंची मानसपूजा करणे,
- नियमित गुरुमंत्राचा जप करणे,
-----------------------------
* सकाळी -
- रोज शुचिर्भूत होणे,
- तुळशीची पूजा करणे,
- घरातील देवांची पूजा करणे,
(ब्रह्मयज्ञ - देव, ऋषी, पितर, मनुष्य, भूत (मानवेतर सजीव सृष्टी) यांचे स्मरण व तर्पण)
-------------------------------------------------------------
* माध्यान्ही (दु. १२ ते २) -
- दुपारी कावळ्याला दहीभाताचा घास देणे (काकबली),
- दुपारी देवांना नैवेद्य दाखवणे,
- आलेल्या अतिथीला जेवायला बरोबर घेणे.
------------------------------------------
* सायंकाली (संध्या. ५ ते ७) -
- संध्याकाळी देवापुढे व तुळशीपुढे तुपाचा दिवा लावणे व देवांची स्तोत्रे म्हणणे.
- सद्ग्रंथांचे वाचन-चिंतन-मनन करणे.
---------------------
* रात्री (९ ते ११)
- रात्री झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करणे व आपली सर्व कर्मे त्य़ाला अर्पण करणे.

॥श्रीराम समर्थ॥