सद्गुरुचे महत्व
----------------
संदर्भ - चरित्र - पान - ६४८ ते ६५३
------------------
साधकाच्या साधकपणाची सुरुवात स्वतःमधील सततच्या असमाधानाची जाणीव होण्यातून होते
साधन दोन अंगांचे असते. (एकाच वेळी दोन्ही गोष्टी होतात)
१) श्रीसद्गुरुकडून आलेल्या नामाचा अभ्यास
- यामुळे मनात भरलेले दृश्य जगाचे संस्कार पुसले जातात. जगाच्या खरेपणाबद्दलचा आपला भ्रम क्षीण होत जातो.
२) सद्गुरुचे अनुसंधान
- सद्गुरुच्या अस्तित्वाचे सूक्ष्म संस्कार मनात भरले जातात. सद्गुरुच्या अस्तित्वाबद्दलचा निःसंशयपणा क्रमाक्रमाने वाढत जातो. मग साधकाला स्वानंदाची चटक लागते.
महाराज या स्वानंदाला समाधान म्हणतात.
- समाधान मिळाल्यावर माणसाला आणखीन काही मिळवायचे उरत नाही.
- समाधान संपन्न माणसाला काही समस्या उरत नाही
- सारे संशय ब्रह्मांडाबाहेर जातात
- जगाचे व जीवनाचे कोडे उलगडल्यामुळे काळजी व दुःख यांचा स्पर्श त्याला होत नाही.
- समाधानाने भरलेला असा माणुस अनेक स्त्री-पुरुषांना समाधानरूप होण्याचा निश्चित मार्ग दाखवतो.
महाराजांनी असा मार्ग दाखवलेला आहे.
॥श्रीराम समर्थ॥