२९ जानेवारी

२९ जानेवारी

  • नामावर दृढ भाव कसा निर्माण होईल? -
    • विषयांवरचे प्रेम कमी करावे.
    • ‘नामच मला तारणार आहे’, यावर निष्ठा ठेवावी.
    • नाम घेत असताना, ‘यश देणारा परमात्माच आहे’, असा भाव असावा.
  • परमात्म्याला शरण कसे जावे? -
    • ‘परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कोणी नाही’, असा दृढ विश्वास ठेवावा.
    • ‘आपण काही करीत नसून, आपल्या हिताकरिता सर्व काही तोच करवून घेतो आहे’, असे मानावे.
    • ‘भगवंत हा आपला जिवलग सखा आहे’, असा विश्वास धरल्यावर काळाजी राहात नाही.
    • परमात्म्याच्या नामाशी पुष्कळ सहवास घडत राहिला की, त्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न होतो.
    • ‘भगवंत आपल्यापाशी आहे’, या भावनेने आपण निर्धास्त राहावे.
    • संपूर्ण नि:शंक होणे आवश्यक आहे.

॥श्रीराम समर्थ॥