शंकेचे निराकरण (२३ ते २९)
--------------------
या शंकेमुळे स्वामींना शिष्याचा भाव समजला व अनुभवाच्या तो निकट आला आहे हे लक्षात येऊन त्यांना आनंद झाला. त्यांनी शिष्याकडे प्रेमळ नजरेने पाहिले (आपले ज्ञान संक्रान्त केले). व म्हणाले -
माणूस स्थूल देहाने मेला तरी सूक्ष्म देहाने वासनामुक्त असा तो उरतोच.
त्या वासना भोगण्यासाठी तो पुन्हा जन्म घेतो.
या स्थूल देहाचे मूळ लिंगदेह आहे.
त्यात अनंत वासनांचा साठा असतो.
कारणदेह हा अज्ञानमय आहे तिथे आत्मविस्मृती असते.
--------------------------
जिथे तो आत्मा मीच असे ज्ञान होते तो महाकारण देह.
हा ज्ञानाच्या कक्षेत येतो.
आत्मस्मृति हे त्याचे प्रधान लक्षण
अज्ञानामध्ये मी देह आहे ही भावना असते.
ज्ञानामध्ये मी आत्मा ही भावना असते (अहम् ब्रह्मास्मि)
या अवस्थेत एकच वृत्ति अखंड रहाते
मनाचा आधारच जर नाहीसा झाला तर दृश्याचा अफाट पसारा अंतर्धान पावतो
मग माणूस खात्रीने जन्ममरणाच्या चक्रातून सुटतो
तुर्येमध्ये आत्मस्वरूपाची जाणीव असते तशीच विश्वव्यापीपणाची जाणीव असते.
नंतर ही अवस्थाही जिरते व विश्वव्यापी मी सुध्दा उरत नाही.
----------------
तुर्यातीत अवस्था प्राप्त होते हे भक्तीचे फल.
त्यामुळे संसारमूळ जे अज्ञान ते नाहीसे होते.
मग निःसंग व निर्मल आत्मा आपणच आहोत असा साक्षात्कार होतो
भक्त आत्मस्वरूपाला ईश्वर या नावाने ओळखतो
ईश्वराचे अखंड स्मरण राखणे आणि देहबुध्दीचा मी ईश्वरामध्ये संपूर्णपणे विलीन करणे याला भक्ती म्हणतात.
ईश्वराचे खरे प्रेम निर्माण झाल्याने त्या प्रेमापायी ईश्वराच्या चरणी संपूर्णपणे नकळत भक्त समर्पित होऊन जातो या अवस्थेमध्ये आत्मज्ञान भक्ताच्या पाठीमागे लागते
भक्ति ही ज्ञानजननी आहे.
॥श्रीराम समर्थ॥