आत्मनिवेदन हेच साधन (३० ते ३४)
------------------------------
मीपणा संपूर्ण गेला की संगातीत अवस्था प्राप्त होते. मी गेला की लक्ष्य जाते
लक्ष्य गेले की अलक्ष्य पण नाहीसारखे होते
शुध्द आत्मस्वरूप तेवढे शिल्लक राहते.
-------------------
जे दिसते त्यास आत्मा म्हणून कवटाळले तर मोक्ष हातून सुटतो म्हणून आत्मनिवेदन करावे. आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण. हाच राजमार्ग आहे.
----------
जेथे मी व तू उरत नाही त्यास आत्मनिवेदन म्हणतात.
या केवल स्वरूपास विज्ञान म्हणतात.
ज्याला ही आत्मनिवेदनाची स्थिती लाभते त्याला पुन्हा जन्मास येणे नसते.
अशी ज्ञानमय भक्ति जो करतो तो देवाचा अत्यंत आवडता असतो
ज्ञानी भक्तांची भक्ति निर्दोष असते
येथे ईश्वरच भक्ताचा भक्त होतो व भक्तीचा आस्वाद घेतो.
साधक सुरुवातीला सगुण मूर्तीचा दास असतो नंतर तो ईश्वरस्वरूप होतो.
तरीही त्याने जर सगुण भक्तीचे महत्व कायम ठेवले तर जगावर फार मोठे उपकार होतात.