सद्गुरुकृपा

॥श्रीराम समर्थ॥

मनु्ष्यजन्म मिळाला हे भाग्य.
सुसंस्कारीत कुटुंबात जन्म मिळाला हे भाग्य.
आरोग्य-उच्च शिक्षण मिळाला हे भाग्य.
उच्च कोटीची मूल्य जोपासल्या गेलेल्या गुरुकुलात सासर मिळाला हे भाग्य.
अशा गुरुकुलात आजन्म सेवा करायला मिळाली हे भाग्य.
स्वतःचे सद्गुरु वेगळे असले तरी घरात त्याचा स्वीकार झाला हे भाग्य.
घर-व्यवसाय-मुले सांभाळून साधना करायला मिळाली हे भाग्य.
साधनेमध्ये येणार्‍या अडचणींना तोंड देऊन ती नेटानं चालू ठेवायला मिळाली हे भाग्य.

हे सर्व ज्यांच्या कृपेमुळे शक्य झालं त्या, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य महाराजांना माझे संपूर्ण समर्पण!

॥श्रीराम समर्थ॥