८ ऑक्टोबर

८ ऑक्टोबर
प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी

सामान्य माणूस
- फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी करतो.
- पण त्यातून सुटण्य़ाचा काही मार्ग पाहात नाही.
- जन्म-मरणाच्या फेर्‍यात अडकून पडतो.
- तो मायेच्या तावडीत सापड्ल्यामुळे करू नये ते करतो आणि उद्याची काळजी करतो.

वास्तव काय आहे?
- मनुष्याची एक स्थिती कायम रहात नाही.
- माणूस जन्माला येतो ते जन्माचं सार्थक करून घेण्याकरीता.
- देहाचे देहपण त्यात जीव असेल तोपर्यंतच असते.
- त्यातून एकदा जीवात्मा नाहीसा झाला की देहपण संपते.
- आत्म्याच्या संयोगाने देहाचे सर्वकाही चालते.

साधकाने काय करावे?
- सध्याच्या गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात परमात्म्याचे स्मरण रहाण्यासाठी त्याचे नाम दिले आहे. म्हणून नेहेमी नामस्मरणात रहावे.
- आपला प्रयत्न कधी सोडू नये.
- व्यवहारात नेहेमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी.
- कर्माचा हेतू जाळून टाकावा.
- रामाच्या इच्छेने सर्वकाही होते ही भावना दृढ ठेवून, मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये.

॥श्रीराम समर्थ॥