१० नोव्हेंबर

१० नोव्हेंबर
----------------
शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥
------------------------------
दुःख-काळजी कशामुळे असते?
- हे जगत्‌ आपण सत्य मानले
- आपण मागील गोष्टी आठवतो, पुढच्या गोष्टींचे चिंतन करतो
- सुखदुःख परिस्थितीवर अवलंबून नसते ते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते.
- आपण आपलेपणाने वागतो त्यामुळे सुख-दुःख, चिंता, शोक यांची मालकी आपण घेतो.
- आपणच आपल्या दुःखाला कारणिभूत असतो.
-----------------------------
त्यावर काय करावे?
- सर्व सत्ता रामाच्या हातात आहे हे ध्यानात घ्यावे
- सर्व काही रामार्पण करावे
- उपास-तापास करू नयेत
- आपण उपासनेत राहावे
- देवाकडे विनंती करावी की तुझे स्मरण तू मला दे.
- रामाला आपला देह अर्पण करावा
- धीर सोडू नये
- महाराजांचे वचन सत्य मानावे
- भगवंताचे सतत नाम घ्यावे
- प्रारब्धाने आलेले कर्म न विसरता रामाला अर्पण करावे.
--------------
त्यामुळे काय होईल?
- काळजी - तळमळ जाईल (ही खूण)
- राम आपल्यावरचे ओझे उतरवील
- परमात्मा फार दयाळू आहे तो आपल्या हिताचेच करील
- राम सर्व पाहात असतो
- तोच आपल्याला समाधान देईल.

॥श्रीराम समर्थ॥