१ जानेवारी

१ जानेवारी
नाम हे परमात्मस्वरूपच आहे.

  • नाम म्हणजे भगवंताचे नाव.
  • नाम हा जीव आणि शिव यांच्यातील दुवा.
  • नाम हे साधन.
  • नाम हे साध्य.
  • नाम सगुण (भगवंत सगुणात आल्यामुळे).
  • नाम निर्गुण (भगवंत सगुणातून गेला तरी शिल्लक राहिल्यामुळे).
  • नामाचा आरंभ सगुणात.
  • नामाचा शेवट निर्गुणात.
  • नाम हा सत्संगाचा पाया.
  • नाम हा सत्संगाचा कळस.
  • नाम म्हणजे आपली वृत्ती व भगवंत यांना जोडणारी साखळी.
  • नाम घेतल्याने वृत्ती सुधारते, चित्त शांत होते, निष्ठा उत्पन्न होते.
  • नामाला स्वत:ची चव नाही. आपली गोडी आणि आवड त्यात घालावी लागते.
  • इतर कितीही साधने केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते.
  • नाम घेताना ते आपल्या कानांनी ऐकावे.
  • नाम घेता-ऐकता स्वत:ला विसरून जावे.
  • देवाचे देवपण (ओळख) त्याच्या नामात आहे.
  • देहबुद्धी कमी होत गेली की नाम अधिक व्यापक आणि अर्थगर्भ होत जाते.
  • नाम हे परमात्मस्वरूप आहे, हा शेवटचा अनुभव.
  • अंत:काळी सुटणारी शेवटची वस्तू म्हणजे नाम असली पाहिजे.

॥श्रीराम समर्थ॥