८ सप्टेंबर
थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे.
------------------------------------------------------------
माया -
जे परमात्म्या शिवाय असते ती माया.
जे दिसते आणि नासते ती माया.
नामाचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या आधीन असतो.
आपण सगुणरूपाची भोळीभबडी भक्क्तीच करावी.
देवाला अनन्य शरण जाउन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळ्ते.
फार वाचन केले की खरे साधन बाजूलाच राह्ते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे.
दिवसाची एक घटका तरी भगवंताच्या स्मरणात घालवावी.
प्रपंचाची आवड असु नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी.
कर्तव्ये करताना त्यामध्ये गुंतून राहू नये.
आपण मनाने भगवंताचे होऊन रहावे.
प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे.
देवाला मानावे,आणि त्याला आवडेल तेच करावे हे परमार्थाचे सार आहे.
॥श्रीराम समर्थ॥