२० नोव्हेंबर

२० नोव्हेंबर
-----------------
रामापरते सत्य नाही
------------------------
परमात्म्याची माया
- चातुर्य, बुध्दी, देहभाव, वासना, कल्पना ही सर्व मायाच जाणावी
- ही फार जुनाट (अनंत/पुरातन) आहे
- ती सर्वांकडून कष्ट भोगवते
- देहबुध्दी ही अविद्यात्मक आहे
- ती फार पराक्रमी आहे
- तिची शक्ती फार मोठी आहे
- ती आत्मदर्शन करु देत नाही
- म्हणून जेजे दिसते ते ते नासते (नसते/नाहीसे होते) हे लक्षात घ्यावे
----------------------------------
परमात्मा
- सर्व व्यापून जो वेगळा राहतो तो परमात्मा
- परमात्मा हे एकच सत्य आहे
- रामसत्तेवीण पान सुध्दा हालत नाही
- श्रीरामरूप ब्रह्मस्वरूप आहे, निर्गुण आहे, सुंदर सगुण आहे
- राम हाच दुःखाचा हर्ता व सुखाचा कर्ता आहे
- रामाविना हित असूच शकत नाही
- परमात्मा न्यायरूप आहे
- परमात्मा आपल्या आधी आला
- आपल्या सोबत राहिला
- आपल्या मागे उरला
- राम सर्वव्यापी भरलेला आहे
- त्याच्याविना काहीच असू शकत नाही
- सर्व जीव परमात्म्याच्या अधीन आहेत
--------------------------------------------------
आत्मा
- तू (प्रत्येकजण) आत्मा आहेस
- तू अजन्मा आहेस
- तुला जन्ममरण नाही
- तू निर्गुण, निराकारी आहेस
- तुला जन्ममृत्यूचा फेरा नाही
- तू शरीरात सत्तारूपात राहातोस
- तू कर्ता, हर्ता नाहीस
-------------------------------------------
हे सर्व समजून घेऊन साधकाने काय करावे?
- विषय आपल्याला ठार मारतात हे समजून घ्यावे व ते दूर करावेत
- आजवर जे जे काही आपण केले (पापपुण्य) ते भगवत्‌चिंतनाने (अखंड नामस्मरणाने) जाऊ शकते.
- सर्वकाही पूर्ववत्‌ चालू ठेवावे, मात्र मन रामाला लावावे
- कधी उदास होऊ नये
- रामावर विश्वास ठेवावा
- स्वार्थरहित प्रेम करायला जमले की समजावे की परमात्म्याची कृपा आःए
- जे जे घडते त्यात परमात्म्य़ाची सत्ता पहावी
- रामाचा आधार आपल्या आधी येतो
- मी-माझे केल्याने तो सोडून जातो....राम हाच आपला प्रभू व त्राता मानावा

॥श्रीराम समर्थ॥