कलियुगातील निषिध्द कर्मे

कलियुगातील निषिध्द कर्मे
[संदर्भ - धर्मसिंधु]
---------------
१) अभक्ष्यभक्षण - मांसाहार, स्थल-कालाला अनुरूप न खाणे
२) अपेयपान - सूरापान (दारु पिणे)

३) परस्त्रीगमन - स्वतःची बायको सोडून दुसर्‍या स्त्रीबरोबर संभोग करणे
४) ब्रह्महत्या - खरे साधू-संन्यासी-संत, सदाचारी वैदिक ब्राह्मण यांचा अपमान करणे, त्यांच्याशी वाईट वागणे.
५) वानप्रस्थाश्रम - मध्यम वयात घर सोडून, गृहस्थाश्रमाची कर्तव्ये सोडून निघून जाणॆ
६) श्राध्दकार्यात भोजनात मांस वाढणे
७) दारुविक्री
८) सोन्याची चोरी
९) कलीची ४,४०० वर्षे उलटल्यावर संन्यास घेऊ नये (कलीची ५१०० वर्षे सरली आहेत.) संन्यासधर्माचे पालन करण्यासाठी आवश्यक परिस्थिती राहणार नाही. तरीही संन्यास घेतला तर आत्मवंचना व समाजाची फसवणूक होईल.

॥श्रीराम समर्थ॥