रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन
-----------------------------------------------------
॥श्रीराम जय राम जय जय राम॥ हा निराकार तारक मंत्र आहे.
तिन्ही लोकांत एक रामनामच श्रेष्ठ आहे.
म्हणुन हा मंत्र वारंवार जपावा.
रामनाम दृढ धरावे.
जानकीकांत आळवावा.
रामनाम चाळा लागावा.
सर्वकाळ गोपाळ आळवावा.
संतांचे संगतीमधे सर्वकाळ असावे.
ह्या पंथाने श्रीपती जोडावा.
विवेक धरुन रामनाम सदा जोडावा.
भक्त वत्सल राम ह्रदयी धरावा.
----------------------------------------
आत्तापर्येंत रामनाम जपलेले महात्मे
पार्वतीरमण रामनाम सदा जपत असतात.
वाल्या कोळ्याने रामनाम जपले.
पापी अजामेळाने सदा रामनाम घेतले.
रामनाम ह्रदयी घेऊन हनुमंताने लंकेला जाण्यास उड्डाण केले.
रामनाम धुनी वाणी उच्चारता पापे जळून जातात.
रामनाम जपाला पूरक साधना.
गोरक्षण करावे.
भूतदया वाढवावी.
अतिथीला अन्न द्यावे.
संतांची संगती धरावी.
विषयांचा त्याग करावा.
रामकृष्ण हरी एकच आहेत त्यांच्या अवतारांच्या लीला वेगळ्या आहेत.
आत्मज्ञान जतन करावे.
रामनामी आस ठेवावी.
एकही श्वास वृथा जाऊ देऊ नये.
दुसर्या कुठल्याही पंथाला वाया जाऊ नये.
मनाच्या मागे जऊ नये.
संसाराच्या जाळ्यात अडकू नये.
----------------------
फल
जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका.
शंकराच्या विषाचे त्यामुळे दहन झाले.
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला.
वैकुंठी गेला.
वानर तरले.
नामामुळे कोटी कुळे उद्धरतात.
संसाराची चिंता नसते.
॥श्रीराम समर्थ॥