बालवृत्ती कशी मिळवावी?

बालवृत्ती कशी मिळवावी?
------------------
- सुख, दुःख, अपमान गिळावे
- दुःख झाल्यास चित्ताला उद्वेग होऊ देऊ नये
- सुखाच्या वेळी निःस्पृही राहावे (अधिक सुख मागू नये)

- दुसर्‍याच्या वस्तूविषयी अंध असावे (दिसूनही न दिसल्यासारखे वाटावे - म्हणजे त्याविषयी वासना निर्माण होणार नाही)
- शांतीचे सुख घ्यावे
- मन-बुध्दि-चित्तात स्वस्वरूप आणि नामाचा ध्यास असावा. मी आत्मा हे चिंतन आणि गुरुने दिलेले नाम अखंड घेणे यामुळे जगात जिकडे पाहावे तिकडे परमात्माच दिसतो.
- बालक होणे म्हणजे बालक वासनेमध्ये असून वासना त्याच्यात नसते. त्याप्रमाणे आपण होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपण जगात असून नसावे
- स्वानंदात असावे

फल - आपल्या कर्माचा (केलेल्या व न केलेल्या) दोष लागत नाही.

॥श्रीराम समर्थ॥