श्रीतुकामाईंची पार्श्वभूमी
-------------------------
मूळ गाव -
मराठवाड्यात
नांदेडपासून जवळ
यवतमाळ जिल्हा
उमरखेडपासून जवळ
येहळेगाव
येथे त्यावेळी निजामशाही (मोंगलाई) होती.
-------------
श्रीतुकामाईंचे वडील - श्रीकाशीनाथपंत
- ते यजुर्देवी देशस्थ ब्राह्मण होते
- ते तपस्वी होते
- त्यांची दिनचर्या ऋषीप्रमाणे होती (यजन-याजन-अध्ययन-अध्यापन)
- ते निस्पृह होते
- त्यांनी कधी कोणाकडून दान घेतले नाही
- त्यांनी कधी खोटे भाषण केले नाही
- स्वतःच्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह उत्तम चालू होता
- ते योगी होते
-----------------
श्रीतुकामाईंची आई - पार्वतीबाई
- श्रीदत्त अवधूत हे त्यांचे आराध्यदैवत होते.
- मुल व्हावे म्हणून त्यांनी तीन वर्षे तपश्चर्या केली
- जप करताना डोळा लागल्यावर त्यांना दृष्टांत झाला.
- १८१३ या वर्षी (साधारण २०० वर्षांपूर्वी) मार्च महिन्यात फाल्गुन वद्य पंचमीस श्रीतुकामाईंचा जन्म झाला.
॥श्रीराम समर्थ॥