श्रीतुकामाईंचे बालपण
------------------------
श्रीतुकामाई कसे होते?
- त्यांचे डोळे खूप तेजस्वी होते
- ते आजानुबाहू (गुडघ्यापर्यंत हातची बोटे पोचणे - अवतारी पुरुषाचे लक्षण)) होते.
----------------
इतर महत्वाचे संदर्भ -
- ते तीनचार वर्षांचे असतानाच त्यांची आई गेली
- वडिल विरक्त प्रकृतीचे
- घरात आई नाही...त्यामुळे ते दिवसभर खेळत असत
- कुठेही खावें, प्यावें, रात्री झोपायला घरी यावें
---------
एक विलक्षण घटना -
तुकामाई ५ वर्षांचे होते. नदीच्या पात्रात खड्डे खणून लपून बसण्याचा खेळ खेळताना, तुकामाईंनी मोठा खड्डा खणला व त्यात ते लपले. अचानक नदीला पाणी आले. बाकीची मुले पळून गेली. तुकामाई तसेच बसून राहिले.
रात्री उशीरा मुलगा घरी आला नाही म्हणून वडील शोध घेताना हाका मारू लागले तेव्हा तुकामाई बाहेर आले.
वडिलांनी’ "तुला भीती नाही का वाटली?" असे विचारता ते म्हणाले की," मी तिथे आनंदात होतो. मी प्राणनिरोध केला होता. त्यामुळे पाण्याची भीती वाटली नाही.
- आपल्या मुलाचे वेगळेपण वडिलांच्या लक्षात आले.
॥श्रीराम समर्थ॥