श्रीतुकामाईंची कुमारावस्था

श्रीतुकामाईंची कुमारावस्था
----------------------------
- श्रीतुकामाई १२-१३ वर्षांचे असताना एकदा त्यांनी वडिलांना विचारले की," तुम्ही रोज डोळे झाकून बसता तेव्हा काय करता?"
तेव्हा वडिल म्हणाले की," मी माझ्या गुरुचे ध्यान करतो".
त्यावर श्रीतुकामाई उद‌गारले की,"गुरुचे ध्यान करायला डोळे झाकायलाच हवेत का?"

[याचा नेमका अर्थ काय असावा? याचा मी विचार करत असते. माझा अज्ञ माणसाचा तर्क असा आहे की ते त्यांच्या गुरुंना उघड्या डोळ्यांनीही पहात असणार, आणि तेही गुरुचा साक्षात अनुग्रह होण्यापूर्वी]
----------------
श्रीतुकामाईंचे व्यक्तिमत्व -
- त्यांचे शरीर चांगले धष्टपुष्ट आणि कांतिमान्‌ होते.
- त्यांची बाह्य राहणी अस्ताव्यस्त होती.
- ते चिलीम पीत.
--------------------------------
इतरांशी वागणूक -
- त्यांची शेते करणार्‍या धनगराच्या घरी जाऊन ते कांदाभाकरी खात. तो त्यांना साधू मानत असे.
- श्रध्दाहीन, अपवित्र व लबाड माणसांना ते शिव्या देऊन हाकलून लावाय़चे
लोक त्यांना वेडा तुक्या म्हणायचे
- ज्याचे अंतःकरण शुध्द आहे अशा मांणसांशी त्यांचे भाषण फार मार्मिक व अर्थपूर्ण असायचे.

॥श्रीराम समर्थ॥