श्रीतुकामाईंची बाह्य स्थिती
----------------------------
श्रीतुकामाईंचे बाह्य रूप
- पिवळसर गोरा वर्ण
- आजानुबाहु
- भरलेले शरीर
- प्रसन्न व शांत मुद्रा
- डोळ्यांमध्ये दिव्य तेज
- बोलण्यामध्ये मार्मिकता
- प्राणिमात्रांविषयी प्रेमभावना
------------------------------
लोक तुकामाईंच्या मागे अहोरात्र लागल्यामुळे त्यांना स्नानाला, भोजनाला व निजाय़लाही फुरसत मिळेना.
- तुकामाईंनी त्यांना शिव्या दिल्या
- ते लोकांना अभद्र बोलले
- त्यांनी लोकांना हाकलून लावलं
- तरी लोक पाय सोडिनात तेव्हा ते जंगलात पळून गेले
- तुकामाई अत्यंत निस्पृह होते.
- ते उग्र होते
- ते कठोर होते
- त्यांच्याजवळ एक रिकामी चिलीम असे. त्यात तंबाखू नसे व अग्नी ही नसे. पण "जय गुरु" म्हणून मोठ्याने झुरका मारला तर चिलीमीतून ज्वाला निघत.
- त्यांच्यापाशी टिट्या आणि गण्या असे दोन कुत्रे होते. तुकामाईंनी खायला दिल्याशिवाय ते काही खात नसत. गण्या मेला तेव्हा तुकामाईंनी त्याला अग्नी दिला.
- त्यांना ढोंगाची चीड होती
॥श्रीराम समर्थ॥