१३ डिसेंबर

१३ डिसेंबर
-------------
भगवंताची सेवा शुध्द भावनेनेच होऊ शकते.
-----------------------
प्रापंचिकाचे वागणे
- "पैसे आता पुरे" असे तो म्हणत नाही
- "विषय भोग भोगणे आता पुरे" असे तो म्हणत नाही.
- "देवाचे स्मरण आज/आजच्या जन्मात पुरे" असे मात्र तो म्हणतो.
- प्रापंचिक प्रीति/लोभ अनुभवतो, सर्व विकार तो अनुभवतो.
- पोथी वाचतो आणि लिहिणार्‍याच्या मताप्रमाणे "भगवंत नको" असे म्हणायला लागतो.
- तो बोलतो तसे करीत नाही.
- या प्रपंचात, पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरायला लागले तरी त्याची हरकत नसते.
------------------------
साधकाने काय करावे?
- नामाचे अधिष्ठान असेल तरच इतर साधने फलदायी होतात, हे लक्षात ठेवावे. आपल्या प्रत्येक कर्माला नामाची जोड द्यावी.
- भगवंताकडे आपली प्रीति लावावी की त्याची भक्ती होते. आपला लोभ भगवंताकडे लावला की त्याने भगवंताची आवड निर्माण होईल. भगवंत हे आपले स्टेशन आहे हे लक्षात ठेवावे. भलत्यात विषयांत आपण गुंतत नाही ना याकडे लक्ष ठेवावे.
- सर्व पोथ्यांचे सार - कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच आहे.
- आपले बोलणे कमी करावे. जे बोलू तसेच वागावे.
- बोलणे कमी करण्यासाठी मनाला नामात गुंतवावे.
- भगवंताचा विसर पडू न देता, त्याचे स्मरण सारखे ठेवले की त्याच्या एकरूपता होईल.

॥श्रीराम समर्थ॥