श्रीतुकामाईचे महानिर्वाण

श्रीतुकामाईचे महानिर्वाण
-------------------------
सन १८८७ जून महिन्यात रात्री, ज्येष्ठ महिन्यात शुध्द अष्टमीस शुक्रवारी येहळेगाव येथे श्रीतुकामाईंनी देह ठेवला. त्यावेळी ते ७४ वर्षांचे होते.

बापू नावाच्या त्यांच्या शिष्याला आपण जाणार असल्याची कल्पना श्रीतुकामाईंनी दिली होती. त्याला जवळ बोलावून पुढची व्यवस्था आखून दिली.
बापूच्याच मांडीवर माईनी देह ठेवला.
तेथे आता समाधी आहे.
पुण्यतिथीच्या दिवशी तेथे अन्नदान होते.
------------------------------------------------
हे सर्व चरित्र अनेकवेळा वाचून मला काय वाटलं?

श्रीतुकामाईंबद्दल नवलही वाटते, आदर तर वाटतोच. भीतीसुध्दा खूप वाटते.
आपण काही त्यांच्यापुढे टिकलो नसतो असंही वाटतं.
त्यांची कृपा ज्यांनी संपादन केली त्यांच्याविषयी अतिशय आदर वाटतो.
त्यांचे गाव नकाशात शोधण्यासाठी मी अनेक दिवस घेतले.
पुण्याहून कसं जाता येईल? बरोबर कोण येईल? कोणत्या महिन्यात जावं? इ. विचार करून झाला. काहीजणींशी बोलूनही झालं पण अजून योग येत नाही.
अगदी आडगावी कसं जावं?
जावसं तर फार वाटतं.
माझ्या आजेगुरूंची समाधी बघावीशी वाटते. त्यांचं दर्शन घ्यावसं वाटतं.
बघू या माई कधी बोलावतात?

॥श्रीराम समर्थ॥