पर्वकाल

विविध पर्वकाल -
[संदर्भ - निर्णयसिंधू व धर्मसिंधू]
---------------
अ) चतुर्दशी
आ) अष्टमी
इ) अमावास्या

ई) पौर्णिमा
उ) सूर्यसंक्रांती (१२ राशींप्रमाणे) १२
ऊ) दक्षिणायन (२२ सप्टेंबर) आणि उत्तरायण (२१ डिसेंबर) यांचा प्रारंभीचा समय
ए) सूर्यग्रहण व चंद्रग्रहण
ऐ) व्यतिपात योग
ओ) प्रात:(सूर्योदयापूर्वी २ तास), मध्याह्न (सूर्य डोक्यावर असताना दु १२ ते २), सायं (सूर्यास्ताच्या अलिकडचे पलिकडचे १/१ तास अंदाजे संध्याकाळी ५ ते ७).
-----------
या कालांचे महत्व
हे काल परिवर्तन/संक्रमण स्पष्ट करणारे व संधीकाल सूचित करणारे आहेत.
याची फले वैयक्तिक व भौगोलिक दृष्ट्या शुभ-अशुभ सांगितली आहेत.
भावनिक आंदोलने या काळात दिसून येतात.
अनिष्टाच्या निवारणार्थ काही विधी सांगितले आहेत.
- गंगा-गोदावरी-प्रयाग-कुरुक्षेत्र-समुद्र येथे स्नान
- दाने (अन्न-वस्त्र-गोदान-भूमिदान-सुवर्णदान [यथाशक्ती])
- गुरुनिर्दिष्ट जप
- नामस्मरण
- मुख्य म्हणजे सर्वकर्ता परमात्म्याचे स्मरण

॥श्रीराम समर्थ॥