यापुढचा काल कसा असेल?
----------------
संदर्भग्रंथ
- दाते पंचांग
- भविष्यपुराण (श्रीव्यासमहर्षी)
- वायुपुराण
--------------
कलिची एकूण ४ लक्ष व ३२ हजार वर्षे आहेत.
त्याचे चार चरण असतील.
सध्या पहिला चरण चालू आहे.
सध्या तिसरा शालिवाहन शक चालू आहे. त्याच्या १८००० वर्षांपैकी १९३० वर्षे संपली आहेत.
उरलेली १६०७० वर्षे झाली की नवा शककर्ता जन्माला येईल.
चौथा शककर्ता - वैतरिणी नदीकाठी विजयाभिनंदन
त्याचा काल - १०००० वर्षे
--------------------------------
पाचवा शककर्ता - गौडदेशात धारातीर्थी नागार्जुन होईल
त्याचा काल - ४,०००००० वर्षे
---------------------------------
सहावा शककर्ता - कोल्हापूर प्रांतात कल्की होईल
त्याचा शक - ८२१ वर्षे
यानंतर संधीकाल १०० दिव्यवर्षे (१००*३६० = ३६००० मानवी वर्षे) असेल.
त्यानंतर पुन्हा सत्ययुग येईल.
==============================
भविष्यपुराण प्रतिसर्गपर्व, चतुर्थ खंड -
कलिचरण १ जो आता चालू आहे. त्याची ५१०० वर्षे संपली आहेत. १ लक्ष ३ हजार वर्षे उरली आहेत. त्या काळात अंती असे होईल-
- आर्यमार्गाचे (सनातनधर्माचे) अवलंबन करणारे नाममात्र राहतील.
- मलयदेशातील म्लेंच्छांचे अर्बुदीय (?) आर्यांबरोबर भयंकर युध्द होईल. त्यात म्लेंच्छांचा विजय होईल.
- सर्व खंडांमध्ये म्लेंच्छांचा संचार होईल. सर्व पृथ्वी म्लेंच्छमय होईल.
- सर्वत्र अलक्ष्मीचा निवास होईल. (अवदसा - घाण, केरकचरा, पसारा, केसांचा गुंता, रोगराई, दुर्गंधी, अनाचार, आळस, वाममार्गाने पैसे मिळवणे, वाममार्गासाठी पैसे खर्च करणे)
- या म्लेंच्छांचा कलिकडून सत्कार होईल.
- सारे दैत्य (आसूरी प्रवृत्तीचे लोक) हरिखंडात (भारतात?) जलयानांतून येतील. सुमारे १० वर्ष भयंकर युध्द केल्यावर हरिखंडातील लोकांचा दैत्यांच्या मायावी युध्दतंत्रामुळे पराजय होईल.
- हरिखंडनिवासी लोक इंद्राला शरण जातील. इंद्रकृपेने विश्वकर्मा एक दिव्य भ्रमियंत्र निर्माण करेल. त्या यंत्रातून म्लेंच्छविनाशक महावायू उत्पन्न होईल. त्या महावायूचा मुलगा वात्य असेल. तो ज्ञानमय असेल. तो दैत्य, यक्ष आणि पिशाचांचा पराजय करेल आणि त्रैवर्णिक द्विजांचा सत्कार करेल. म्लेंच्छांना त्यांचा व्यवसाय करू देईल. तो पन्नास वर्षे राज्य करेल. त्याचे वंशज १६००० वर्षे राज्य करतील.
- कलिचा प्रभाव कमी झाल्यावर तो दुःखी होऊन बलिराजाकडे जाईल. बलि भगवान वामनाची प्रार्थना करेल व कलिला पुनः प्रतिष्ठा देण्यासाठी विनवेल.
- भगवान वामन यमुनातटावरील गावात दोन मुले निर्माण करेल - भोगसिंह व केलिसिंह. ते वात्यवंशजांचा पराजय करतील. ते कल्पक्षेत्रात जातील.
- कालांतराने वर्णसंकराने सृष्टी निर्माण होईल. ती प्रचंड वाढेल. २००० वर्षानंतर सध्याचा मानव नष्ट होईल.
-----------------------------
कलिचा दुसरा चरण - १ लक्ष ८ हजार वर्षे
- या काळात किन्नरांचा प्रभाव पृथ्वीवर असेल.
- हे दैत्यमय मानव अडीच हात उंच असतील.
- त्यांचं आयुर्मान ४० वर्षे असेल.
- ते कर्महीन असतील.
- या काळात विवाह होणार नाहीत.
- राजा होणार नाहीत.
- कोणी कसलाही उद्योग करणार नाही.
- कोणीही काहीही काम करणार नाही.
- भोगसिंह व केलिसिंह यांचे वंशज सव्वा लाख वर्षे पृथ्वीवर राहतील.
- सर्व पुण्यात्मा अंश देवलोकात जातील.
---------------------------------------------------------
कलीचा तिसरा चरण - १ लक्ष ८ हजार वर्षे
- किन्नरगण हळुहळू नष्ट होतील.
- अशी २६००० वर्ष गेल्यावर रुद्राच्या आज्ञेवरून भृगू ऋषी सौरभी या पत्नीच्या ठिकाणी कौलकल्प नावाचे मानव निर्माण करतील.
- ते सर्व किन्नरांना भक्षण करतील.
- त्यावेळी मानवांचे आयुर्मान २६ वर्षे असेल.
- कौलकल्प आणि भोगसिंह व केलिसंह यांचे वंशज यांच्यात १० वर्षे घोर युध्द होईल. त्यात भोगसिंह व केलिसंह यांचे वंशज पराभूत होतील. ते पाताळात जातील.
- हे कौलकल्प पृथ्वीवर भयंकर सृष्टी निर्माण करतील. आई-बहिण-मुलगी यांच्यावर बलात्कार करतील. कामांध होऊन ते खूप प्रजा निर्माण करतील. या सृष्टी भयंकर तिर्यक - पक्षी/कीटक आदी योनी प्राप्त करतील व नष्ट होतील.
--------------------------------------------
कलिचा चौथा चरण - १ लक्ष ८ हजार वर्षे
- या काळात माणसाचे आयुर्मान २० वर्षे होईल.
- ते कंदमूळ-फळे खाणारे होतील.
- ते मेल्यावर नरकात जातील.
- सारे नरक या माणसांनी भरून जातील.
- नरकात यमराजाचे काम करणारे सेवक यमराजाकडे जातील व परिस्थिती कथन करतील.
- धर्मराज यम चित्रगुप्ताला घेऊन ब्रह्मदेवाकडे जातील. ते सर्व क्षीरसागरात जातील. तेथे श्रीविष्णूभगवंतांची पूजा करतील व रक्षणासाठी प्रार्थना करतील.
- तेव्हा भगवंत आपल्या अवताराची कल्पना देतील.
- काही अगदी थोडी माणसे विरक्त होतील. त्यांच्यामध्ये विवेक (सत्य व असत्य समजू शकण्याची बुध्दी) निर्माण होईल. ही माणसे सर्वांशी सारखाच समानतेचा व्यवहार करतील. त्यांची प्रवृत्ती धर्माच्या दिशेला वळेल. या उरलेल्या अगदी थोड्या लोकांपासूनच सत्ययुगातील प्रजेची सुरुवात होईल.
- लोककल्याणासाठी महर्षी कश्यप संभल गावात जन्म घेईल त्याचे नाव असेल विष्णूयश. तो कृष्णलीला माणसांना सांगेल.
- त्याला महाधूर्त नरकातील प्राणी तुरुंगात टाकतील. तेव्हा भगवान नारायण मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला अंधार्या रात्री कल्कीरूपात उत्पन्न होतील. ब्रह्मांडाच्या कल्याणाकरीता सर्व देवताही पृथ्वीवर जन्म घेतील.
- भगवान कल्की त्यांना कल्प, मन्वंतरे, सर्व अवतार इच्या कथा सांगतील.
- सर्व आयुधांनी सज्ज कल्की दैत्यरूप म्लेंच्छांचा नाश करतील.
- कल्की योगमार्गाचा अवलंब करतील.
- १६००० वर्षे त्यांच्या योगाग्नीमुळे पृथ्वीवरची कर्मभूमी तापून भस्म होऊन निर्जीव होऊन जाईल.
- प्रलयंकारी मेघ (ढग) प्रचंड वृष्टी करतील.
- भूमी पाण्याने भरून जाईल.
- कलियुग बलिपाशी जाईल.
- भगवान हरि कर्मभूमीला (पृथ्वीला) रमणीय व वास्तवासाठी योग्य करतील.
- यज्ञ करून देवांना तृप्त करतील.
- देवगण शक्तीसंपन्न होतील.
- वैवस्वतमुनीकडे जाऊन सर्व समाचार सांगतील.
- कल्किच्या मुखातून गौरवर्णी (सात्विक वृत्तीचे) ब्राह्मण, बाहुपासून रक्तवर्णी (रजोगुणी) क्षत्रिय, जानूपासून पीतवर्णी (सत्व व रजोगुणी) वैश्य व पावलापासून श्यामवर्णी (तमोगणी) शूद्र उत्पन्न होतील.
- त्यांना अनेक पुत्र होतील.
- सर्व माणसे सनातन धर्माचे पालन करतील. यज्ञ करतील.
- वैवस्वत, कल्कीला नमस्कार करून त्याच्या आज्ञेने अयोध्येचे राजपद ग्रहण करेल.
- त्याला इश्वाकू नावाचा मुलगा होईल.
- भगवान कल्कि ब्रह्मसत्र करतील. चारी वेद मूर्तीमान होतील, ते १८ पुराणांसह तेथे येतील. ते परमेश्वराच्या अंशरूप अशा कल्किची स्तुति करतील.
- कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला गुरुवारी एक श्रेष्ठ पुरुष यज्ञकुंडातून उत्पन्न होईल.
- सत्यमार्गाचा प्रदर्शक असा तो सत्ययुग या नावाने ओळखला जाईल.
- ही तिथी लोकमंगलदायिनी आणि पापनाशिनी आहे.
- भगवान कल्कि आवळ्याच्या वृक्षाखाली अंतर्धान पावतील.
----------------------------------------------------------------
संधीकाल - १००*३६० वर्षे
- दैत्य व देव यांच्यात घनघोर युध्द होईल.
- मेलेल्या दैत्यांना शुक्राचार्य जिवंत करतील. थकलेले देव क्षीरसागरनिवासी भगवंताकडे जातील. भगवंत हंसरूप घेतील व सर्व दैत्यांचा नाश करतील. सर्व दैत्य पाताळात जातील.
- देव भयरहित होतील.
- वैवस्वतपुत्राचा इश्वाकूचा अभिषेक होईल. - तो ३६०*१०० वर्षे आयुष्य भोगून शरीराचा त्याग करेल.
- ते इश्वाकू १००*३६० वर्ष आयुष्यमान असणारे होतील.
---------------------------------------------
सत्ययुग -
- माणसांचं आयुर्मान ४०० वर्षे असेल.
- धर्माचे चारही पाद उपस्थित असतील.
- आत्मज्ञान म्हणजे ज्ञान
- अध्यात्मचिंतन म्हणजे ध्यान
- मनाची स्थिरता म्हणजे शम
- इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम
------------------------------
चार युगांची एक चौकडी असते.
अशा ७२ चौकड्यांना मन्वन्तर म्हणतात.
प्रत्येक मन्वन्तराचे ८ प्रकारचे देव, ऋषी, व मनू असतात.
॥श्रीराम समर्थ॥
Comments
यापुढचा काल कसा असेल?
kaliyugachi evdhi varsha shilak ahet mag loke jagbudichi bhasha ka karat ahet???
People tend to believe whatever they hear
In general, its a natural tendency to believe whatever is heard instead of going in depth and finding out the reality.
Once you know the reality, you see the same world in different perspective.