भगवंताचे अनंत अवतार

या अनंत कालावधीत भगवंताचे अनंत अवतार कैकवेळा होऊन गेले व अजून होणार आहेत.

भगवंताने अवतार घ्यावा असे कोणाला व का वाटते?

- जेव्हा पृथ्वीवर आसूरी (विघातक) शक्तींच्या वर्चस्वाखाली सर्व सृष्टी वेठीला धरली जाते.
- जेव्हा सज्जनांचा उपमर्द, घात, अवहेलना होऊ लागते.
- जेव्हा सर्व जीव मेटाकुटीला येतात.
- जेव्हा गाईच्या रुपात पृथ्वी व वृषभाच्या रूपात धर्म, अनेक सिध्द-महात्मा-ऋषी-मुनी-देवदेवता यांना बरोबर घेऊन ईश्वरापाशी जातात व त्याची स्तुती गातात, त्याच्यापुढे परिस्थितीचे कथन करतात व सर्वांना यातून वाचवण्याची प्रार्थना करतात.
---------------------------------------------
भगवंताची योजना -

- माझे लक्ष आहे आणि योग्यवेळी मी जन्म घेणार आहे, व माझे अवतारकार्य करणार आहे असे भगवंत आश्वासन देतात.
- कधी, कोठे, कशा स्वरूपाचा हा जन्म असेल व कोणते अवतारकार्य असेल हे ही सविस्तर कथन करतात.
- इतरांनी विविध रूपात जन्म घेऊन या अवतारकार्याला कसा हातभार लावायचा आहे हेही सांगतात.
-----------------------
या अवतारकार्याचे दोन भाग असतात -
१) दुष्टांचे निर्दालन करणं
२) सुष्टांचे रक्षण करणं

ध्येय -
पडझड झालेल्या धर्माची स्थापना करणं
-------------------------------
ज्या असूरांचा संहार होतो त्यांच्यापैकी जे भगवंताकडून मारले जातात त्यांना मोक्ष मिळतो कारण भगवंताचा झालेला प्रत्यक्ष स्पर्श.

॥श्रीराम समर्थ॥