मला हा लहानपणापासून पडलेला प्रश्न होता की
- अगदी कडेलोट होईपर्यंत पृथ्वी अन्याय सहन का करते?
- सुष्ट इतके हतबल का होतात? त्यांना दुष्टांचे निर्दालन का करता येत नाही?
- दुष्ट शक्ती इतक्या बलवान, निर्लज्ज, कोडग्या, बेमुर्वत कशा होतात? दुसर्यावर अन्याय करताना त्यांना भीती कशी वाटत नाही?
- भगवंताने इतके अवतार घेतले, इतक्या दुर्जनांना नाश केला, असे त्याने अनंत वेळा केले तरी दुर्जन संपत कसे नाहीत? पुन्हापुन्हा ते जन्माला कसे काय येतात?
- एखादी व्यक्ती दुर्जन का होते?
- दुसरी एखादी व्यक्ती सज्जन का होते?
- दुर्जनांमध्ये एकी का असते? त्यांची संख्या इतकी जास्त का असते? त्यांच्याकडची संहारक अस्त्रे इतकी प्रभावी विनाशक कशी काय असतात?
- भगवंताच्या अवताराला इतके लढावे का लागते? दुर्जनाचा पाडाव करायला त्य़ाला/तिला एवढा वेळ का लागतो?
॥श्रीराम समर्थ॥