१९ मे

भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी.
---------------------------------------------
प्रपंचामध्ये प्रेमाने कसे वागता येईल?

- प्रत्येक माणसाने आपल्यामधले दोष थोडेथोडे तासावे.
- त्याकरीता विचाराने व काळजीने वागावे.
- प्रेमाचा धाक असावा; भीतीचा धाक असू नये.

------------------------------------------------
प्रपंचामधली आसक्ती कशी कमी होईल?

१) भगवंताबद्दल आपलेपणा वाटणं
२) अनुसंधान
३) सत्संग
---------------------
भगवंताबद्दलच्या प्रेमाचे महत्व -

- भगवंताचे प्रेम हे एक वेड आहे.
- ते लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात.
- भगवंताचे प्रेम हे कोणत्याचाही साधनाचा प्राण आहे.
- ते प्रेम मागण्याकरीता रोज भगवंताची प्रार्थना करावी.
- ज्याला भगवंताचे प्रेम येते तो सृष्टीकडे कौतुकानं पाहतो.
- भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्याआड दुसरे काहीही येऊ शकत नाही.
- भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल, त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढत जाईल.
- भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवावी, प्रेम ठेवावं.
- भगवंत हा सुलभसाध्य आहे.
- हीनाहून हीन आणि अडाण्याहून अडाणी अशाला सुध्दा भगवंत मिळू शकतो.

॥श्रीराम समर्थ॥