ब्रह्मदेवाने सत्वगुण निर्माण केला.
त्याच्या योगाने त्याने स्वर्गात राहण्यासाठी योग्य अशा देवदेवता यांची निर्मिती केली.
हा गुण अतिशय हलका, तरल व सूक्ष्म आहे.
मानवी मनामध्ये याचे स्थान अभावाने व नगण्य असते.
विशेषतः कलियुगात हा सापडणंच मुष्किल आहे.. कारण भोंदूगिरी जास्त आहे.
खरे सज्जन शोधूनही सापडत नाहीत.
जे असतात ते विखुरलेले असतात.
ते त्यांच्या निजानंदामध्ये मग्न असतात.
ते सूक्ष्म रुपात भक्तांना मदत करतात.
भक्तही रजोगुणी जास्त करून असतात - प्रपंचातल्या सुखे मिळवण्यासाठी त्यांना भगवंत हवा असतो.
अस्सल भगवंतासाठी वेडा होणारा भक्त पहायलाही मिळत नाही.
त्यामुळे सत्वगुणी माणसांची वानवा असते.
सज्जन संख्येने, बळाने जास्त आलेल्या अज्ञानी हट्टी तमोगुणी माणसांच्या समुदायाला पुरे पडू शकत नाहीत.
॥श्रीराम समर्थ॥