रुद्राच्या अवतारामध्ये भगवंत सर्व सृष्टी आपल्यामध्ये आवरून घेतो.
या प्रक्रियेमध्ये तमोगुणही इतर गुणांबरोबर सुप्त व गुप्त होतो.
सृष्टीच्या पुनर्रच्चनेच्या काळात तमोगुण सर्वात प्रथम प्रकट होतो.
त्याच्या बरोबर अनंत अशा आशा, इच्छा, आकांक्षा, अज्ञान यांना प्रकट होण्याची संधी मिळते.
जसा भगवंत अनंत आहे तशा या इच्छाही अनंत आहेत.
या इच्छा कोणत्या असतात?
- मी सर्वशक्तीमान असावं.
- मला हवं ते, हवं तितकं, हवं तेव्हा मिळावं.
- मला कधी मृत्यू येऊ नये.
- मला कुठेही भ्रमण करता यावं
- माझ्या वरचढ कोणी नको.
- मला कोणी स्पर्धक नको
- मी म्हणेन तसं लगेच व्हायला पाहिजे
- मला कोणतही रूप घेता आलं पाहिजे
- माझी सर्वांनी स्तुति करायला पाहिजे.
- मला कधॊ व्याधी-शारीरिक त्रास होता कामा नयेत.
- मला भूत-वर्तमान-भविष्य यांचे ज्ञान असायला हवे.
....
या इच्छा दुर्दम्य आहेत.
त्या कधीही पुर्या होणार्या नाहीत.
विशेषतः "मी" पणा जोपर्यंत आहे तोपर्यंत तर नाहीच.
त्यामुळे दुःखही अनंत आहे.
त्यामुळे तमोगुणही न संपणारा आहे.
त्यामुळे प्रत्येक युगात सर्वकाळात तमोगुणाचा प्रभाव वाढताच असतो.
॥श्रीराम समर्थ॥