दुर्जनांचे वैशिष्ठ्य -
- दुष्ट हे त्यांच्या अघोरी साधनेमुळे पुष्ट झालेले असतात.
- त्यांच्याकडील अघोरी शक्ती अतिशय बलवान असतात.
- त्या शक्तींचा वापर ते सज्जनांच्या अहिताकरीता करतात.
- जोपर्यंत या शक्ती आहेत तोपर्यंत त्यांना कोणी हात लावू शकत नाही.
- त्यांची सत्ता त्यामुळेच वाढती राहते.
- सत्तेच्या पायी ते अजूनच पापे करायला प्रवृत्त होतात.
- त्यांना परमात्म्याची भीती वाटत नाही.
- वाईट शक्ती त्यांच्याकडून अजून पापकर्मे करून घेतात.
- त्यांची बलस्थाने व मर्मस्थाने गुप्त असतात.
- त्यांचा शोध सामान्य माणसाला लागणे अवघड असते.
परमेश्वरी इच्छा -
- त्यांच्या पापांचा घडा भरेपर्यंत भगवंत शांत राहतात.
- आसूरी प्रवृत्तीच्या लोकांना सतत यश मिळणे यामागे परमेश्वरी इच्छा असते.
- त्या यशामुळे उन्मत्तता येते व अजूनच पापकर्मे होत जातात.
- कोठे थांबावे हे त्या अज्ञानी जीवाला कळत नाही. इतर समंजस माणसाचे ऐकण्याची सुबुध्दी त्याच्यापाशी नसते.
- त्याला आपल्या कर्मांमुळे कुलनाश होईल याचीही खंत नसते.
- तो भगवंताला हिणवतो, त्याचा अपमान करतो, त्याची निर्भत्सना करतो.
- तो स्वतःलाच परमेश्वर समजतो.
- जसे वैयक्तिक प्रारब्ध असते तसेच ते सामूहिकही असते.
- दुर्जनाची एकी असल्याने व त्यांची सत्ता मोठी असल्याने त्यांचे प्रारब्धही एक-सामूहिक असते.
भगवंताकडून दुर्जनांचा नाश -
आसूरी दुष्टांमधील कमकुवत दुवा (सत्ता-सेक्स-करमणूक-अन्न-पैशाचा हव्यास-सुखसाधने) भगवंताला माहीत असतो.
त्याचा उपयोग करून घेऊन दुर्जनांचा पाडाव कसा करायचा हे त्याला माहीत असते.
या दुर्जनांना निर्माण ब्रह्मदेवाने केल्याने त्यांची अंडीपिल्ली त्याला माहीत असतात.
योग्यवेळी अशा दुर्जनांना शिक्षा मिळते, त्यांचा कुलनाश होतो.
त्यांचे साम्राज्य धुळीला मिळते.
होत्याचे नव्हते होते.
भीषण संहाराच्या खूणा फक्त मागे राहतात, त्याही युग संपताना होणार्या प्रलयामध्ये नामशेष होतात.
देहपातानंतर सर्व दुर्जन अनंतकालापर्यंत नरकात यमधर्माने दिलेली शिक्षा भोगतात.
॥श्रीराम समर्थ॥