सज्जनांचे इतके हाल का होतात?

- सज्जन भक्तांचे हाल होण्यामागेही परमेश्वरी योजना असते.
- हाल झाल्यावर, अन्याय झाल्यावर, अपरंपार दुःख झाल्यावर राग येणं व अघोरी विचार येणं आणि तशी अघोरी कृत्ये घडणं ही पशूभावना असते.
- त्या पशूभावनेमागे देहबुध्दी असते. म्हणजेच "मी/मला/माझे" याचे प्राबल्य असते.
- ज्याक्षणी "तू कर्ता" हा भाव जाऊन "मी कर्ता" हा भाव येतो तेथे अज्ञानाचे अस्तित्व असते.
- अज्ञान हे बलशाली असते..सज्जनाचा दुर्जन व्हायला वेळ लागत नाही.
- असा मनुष्य परमेश्वरी कसोटीत नापास होतो.
- असा मनुष्य परमेश्वर भक्त म्हणून स्वीकारत नाही.
--------------------------------------------
हाल होत असतानाही ज्या भक्ताचे अनुसंधान जात नाही. ते भोग तो समजून उमजून परमेश्वराची इच्छा म्हणून भोगतो तो परमेश्वर कृपेला पात्र होतो.

परमेश्वरी कृपा कशी ओळखायची?
- मन शांत व आनंदी व समाधानी राहणे
- सतत परमात्म्याचे अनुसंधान राहणे
- प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात दिसणे
- प्रत्येक क्षणी त्याचे स्मरण होणे
- परमात्म्याची लीला सर्व ठिकाणी पाहता येणे, व कोठेही-कधीही-कितीही वेळ त्याला भेटता येते व त्याच्या सन्निध्याचा अक्षय आनंद घेता येतो हे प्रत्ययाला येणे.
- कोणतीच तक्रार न राहणे.
- परमेश्वराच्या योजनाचातुर्याचे कौतुक वाटणे. तो योग्य ते योग्य त्या वेळेल करेल याबद्दल खात्री असणे.
- तो माझ्या मागे-पुढे-सर्व बाजूंनी आहे असे वाटणे.
- तो माझा सततचा सहवासी, सहयात्री, आई-बाप-भाऊ-पोषणकर्ता-त्राता आहे याची जाणीव राहणे.

॥श्रीराम समर्थ॥