सध्याचा अवतार (बुध्दावतार)

- द्वापरयुगात श्रीकृष्णावतार झाला.
- धर्मयुध्द झाल्यावर त्याच्या अवताराची समाप्ती झाली.
- कलियुग सुरू झाले.
- कलियुगात बुध्दावतार सुरु झाला. कित्येको लक्षावधी वर्षे हा अवतार असणार आहे.
- चौथ्या चरणाच्या शेवटी अधर्माचा कडेलोट झाल्यावर शेवटचा म्हणजे कल्कि अवतार होईल.
------------
हा बुध्दावतार कसा आहे?

- हा सूक्ष्म आहे, त्याला स्थूल देह नाही.
- हा मौनी आहे. तो बोलत नाही, सांगत नाही.
- यालाच संत-सत्पुरुष नामावतार म्हणतात.
- भगवंताच्या नामामध्ये याचा वास आहे.
- जिथे कोठे निःस्वार्थी नामजप/नामस्मरण चालू असेल तिथे तो सूक्ष्मरूपाने असतो.
- अखंड अनुसंधानात असणार्‍या साधकाच्या हृदयात तो वस्ती करून असतो.
- जिथे हा असतो तिथे कलि फिरकत नाही.
- याच्या कृपेसाठी सदाचार, नित्य नामसेवा, संपूर्ण शरणभाव याची बैठक लागते.
- अन्नदान व नामस्मरण याचे महत्व या कालात आहे.
- म्हणून तर महाराज म्हणत," मी माझी जिव्हा नामाला विकली आहे."
- ते आजन्म," साधकाने भगवंताचं गोड नाम प्रेमानं सतत घ्यावं." असं सांगत आले.
- ते सांगून गेले की, "मी कोठे गेलो नाही. मी नामात आहे. मला नामात शोधा".

॥श्रीराम समर्थ॥