गुरु कशाला हवा?
-----------------------
प्रपंच -
- व्यवहारात यशस्वी होण्यासाठी सुध्दा गुरु लागतो.
- परमुलखात गेल्यावर तिथल्या प्रदेशात असलेल्या माणसांशी बोलण्यासाठी, तिथला प्रदेश समजून घेण्यासाठी दुभाषा लागतो.
----------------------
खर्या परमार्थाला कोण लागतो?
- प्रपंचात समाधान मिळाले नाही, मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील अशी ज्याला तळमळ लागते तो गुरु करतो.
- ज्याला प्रपंच कडू लागतो तो शिष्य होऊ शकतो.
- ज्याला शिकावे असे वाटते तो शिष्य होतो.
- मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करतो.
------------------------------
बुवा कोणाला म्हणावे?
- जो काही चमत्कार करून दाकवतो त्याला बुवा म्हणावे.
- तो शिष्याला विषयात ओढतो.
----------------------------
गुरु का करावा?
- "मी केले" ही जाणीव परमार्थाच्या आड येते म्हणून सद्गुरुची आवश्यकता आहे.
- सत्कर्माच्या अभिमानाने रामाचा विसर पडतो म्हणून गुरुची आवश्यकता असते.
----------------------------
गुरु कोणाला करावा?
- जो सर्वांभूती भगवंत पाहतो.
- ज्याच्या सहवासात मन निर्विषय होते.
-----------------------------
शिष्य कोणाला म्हणता येईल?
- ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे.
- जो गुरुआज्ञेबाहेर जात नाही.
- जो गुरु हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो.
- जो गुरुपेक्षा वेगळा देवधर्म मानत नाही.
--------------------------
साधकाने गुरुशी कसे वागावे?
- सद्गुरुशी संगत करावी.
- तो म्हणेल तेथे जावे.
- तो सांगेल तसे करावे.
- सर्व शास्त्रे शिकण्यात वेळ घालविण्यापेक्षा सद्गुरुंनी सांगितलेले नामसाधन करावे? म्हणजे भगवंताचे प्रेम लागेल.
- नामस्मरण हे आजच्या कालाला अनुकूल आणि माफक (परवडेल असे - जमेल असे) असे उत्तम साधन आहे; ते करावे आणि आनंदाने राहावे.
॥श्रीराम समर्थ॥